फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग हा एक शुभ राजयोग मानला जातो. ज्यावेळी गुरु आणि चंद्र एकाच घरात असतात त्यावेळी हा योग तयार होतो. हा गजकेसरी राजयोग डिसेंबर महिन्यात तयार होणार आहे. देवगुरू गुरू 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.38 वाजता मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच दिवशी रात्री 10.15 वाजता चंद्र सूर्यात प्रवेश करेल. गुरु ग्रहाचा चंद्राशी युती झाल्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येणार आहे. गजकेसरी राजयोग काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहेत. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या
मिथुन राशीसाठी गुरु आणि चंद्राची युती फायदेशीर ठरणार आहे. यावेळी गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. हा योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कामात यश मिळेल आणि परदेश प्रवासाची शक्यता निर्माण होईल. सर्व परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप शुभ राहणार आहे. यावेळी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती शक्य होईल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला त्याचा फायदा होईल. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
मीन राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला गुरुच्या प्रभावाचा फायदा होईल आणि करिअरमध्ये प्रगती दिसेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे, गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. या काळात नवीन जबाबदारी आणि प्रकल्प तुम्हाला मिळू शकतात. कुटुंब आणि संपत्तीशी संबंधित बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चंद्र आणि बृहस्पति एकत्र आले की गजकेसरी राजयोग तयार होतो. हा योग व्यक्तीला आर्थिक प्रगती, यश आणि प्रतिष्ठा होतो
Ans: धनप्राप्ती वाढते, सरकारी आणि न्यायिक कामे अनुकूल होतात, व्यवसाय आणि करिअरमध्ये अपेक्षित यश
Ans: वादविवाद असत्य बोलणे टाळा, शिक्षक आणि वडिलधाऱ्यांचा अपमान करु नका






