भारतीय संस्कृती ही निसर्गचक्रावर आधारित आहे. हिंदू धर्मात, गणेशोत्सावाला मोठं महत्व आहे. बहुतांश लोकांकडे गणपती बसतो. कोणी दीड पाच सात तर कोणी अनंत चतुदर्शीपर्यंत गणपती बसवतात. यामागे देखील ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि संस्कृती परंपरा आहेत, कसं ते जाणून घेऊयात.
भाद्रपदमधील गणेश चतुर्थी म्हणजेच पार्थिव गणेशपूजन असं म्हणतात. घरगुती गणपती किती दिवसांचे बसतात यामागे एक पुर्वापार आलेलं शास्त्र आहे. गणपती बसवणं म्हणजे आनंद, धमाल मजा मस्ती इतकंच नव्हे तर त्याचं सोहळं देखील तितकंच महत्वाचं असतं. जर तुम्ही गणपती बसवताय तर त्याचे नियम देखील पाळायला लागतात.
दीड दिवसांचा गणपतीची प्रथा त्यांच्यासाठी असते ज्यांना काही कारणांनी दिर्घकाळ बाप्पाची पूजा करणं शक्य होत नाही. त्याचबरोबर काही कुळांच्या प्रथ परंपरा यावरुन देखील गणपतीचं विसर्जन किती दिवसांनी करायचं हे निश्चित केलं जातं.त्याचबरोबर प्रत्येकाच्या सोयीनुसार देखील गणपती दीड दिवस बसवायचा हे ठरलेलं असतं.
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र यांना फार महत्व दिलं जातं. याच अंकशास्त्राच्या आधारे सांगायचं झालं तर, 5 आणि 7 हे विषम संख्या आहेत. या संख्या अंकशास्त्रानुसार शुभ मानल्या जातात. त्याचप्रमाणे काही भाविकांना गणेशाची मनोभावे पूजा करण्याचं भाग्य मिळावं यासाठी देखील पाच ते सात दिवस गणपती बलवले जातात. याचबरोबर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अनेकांकडे गौरी गणपतीचं आगमन होतं. तिसऱ्या दिवशी गौरी पूजन करुन पाच किंवा सात दिवसांनी गणपती आणि गौरीला निरोप दिला जातो. त्याचबरोबर अंकशास्त्रानुसार आणिअध्यात्माच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर पंचमहाभूतं हे 5 या अंकाचं प्रतिनिधित्व करतात. प्राचीन शास्त्रानुसार पाच दिवसांचा कालखंड ऊर्जा चक्र (पंचतत्त्व – पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश) शुद्ध करणारा मानला जातो.थोडक्यात, बाप्पा किती दिवस ठेवायचे यामागे शास्त्रीय कारण, परंपरा आणि सोय या तिन्ही गोष्टी आहेत.
हिंदू धर्म हा निसर्गपूजेला देखील तितकंच महत्व देतो. गणपतीची मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती. 11 दिवस मनोभावे पूजन करुन ही सकारात्मक ऊर्जा निसर्गात विलीन केली जाते. असं यामागील शास्त्र असल्याचं म्हटलं जातं आणि ही परंपरा पुर्वापार चालत आलेली आहे.