फोटो सौजन्य- istock
भाद्रपद महिना सुरु होताच गणेशोत्सवाला सुरुवात झाली. गणपतीचे आगमन होताच गौरी येतात. गौरी गणपतींना विशेश महत्त्व असते. तीन दिवसांच्या या उत्सवात तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींची विधीपूर्वक विसर्जन केले जाते. यंदा आज गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी गौरी गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. या दिवशी विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता? विसर्जनाच्या वेळी कोणत्या चुका करु नये ते जाणून घेऊया.
गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन अगदी थाटामाटात होते. लाडका बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होतो. दीड दिवसांपासून ते पाच, सात आणि दहा दिवसांचा बाप्पा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. परंतु जड अंतकरणाने बाप्पाला निरोप द्यायची वेळ देखील येते. गुरुवार, 12 सप्टेंबरला गौरी- गणपतीचे विसर्जन करण्यात येतील. या दिवशी विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता? विसर्जनाच्या वेळी कोणत्या चूका टाळायला हव्या जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- कलियुगमधील हनुमान का आहेत नीम करोली बाबा, माहित्ये का तुम्हाला?
गौरी गणपती विसर्जन शुभ मुहूर्त
मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन झाले. माहेरवाशीण गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवत तिची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आज 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी गौराईचं विसर्जन होणार आहे. गौरी विसर्जन गुरुवारी संपूर्ण दिवसभरात कधीही करता येणार आहे. 12 सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करायचे असून रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करु शकतो. यादरम्यान भक्तगण आपल्या सोयीनुसार गौरी विसर्जन करु शकतात.
हेदेखील वाचा- घरच्या घरी हिरवी मिरची कशी पिकवता येईल ते जाणून घेऊया
गौरी गणपती विसर्जन करताना काय करावे
उत्तरपूजा करताना गौरीला हळद, सिंदूर, चंदन, ड्रायफ्रुट्स, नारळ, सुपारी आणि नट, विशेष पदार्थ, धूप आणि इतर विविध वस्तू अर्पण केल्या जातात.
गणपतीची उत्तरपूजा झाल्यानंतर मूर्ती हलवावी. तसेच मूर्ती उचलून तिला जमीनीवर ठेवावे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा.
बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर मूर्ती घरातील चहूबाजूंना फिरवावी. त्यामुळे श्रीगणेशाचा वास आपल्या घरात कायम राहतो. घरात सुख-समृद्धी नांदते. या दिवशी बाप्पाला जाताना दही भाताचा किंवा दूध- भाताचा नैवेद्य अर्पण करावा.
श्रीगणेशाची मूर्तीचे तोंड हे नेहमी समोर असायला हवे. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाला निरोप द्यावा.
गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूजा साहित्य आणि निर्माल्याचे देखील विसर्जन करायला हवे. विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा.
गणेश मूर्ती नेताना ती खंडीत होणार नाही याची काळजी घ्यावी. तलावाजवळ किंवा विसर्जन स्थळी गेल्यानंतर बाप्पाची आरती म्हणून त्याचा आशीर्वाद घ्यावा, मगच मूर्तीचे विसर्जन करावे.