जाहिरातजाहिरातView this post on Instagram
A post shared by नवराष्ट्र Lifestyle (@navarashtra_lifestyle)
बुद्ध म्हणाले की, तुला सात घरातून वाटीभर मोहरी आणायची आहे. पण ही सात घरं अशी पाहिजे की, त्या घरातल्या कोणाचा मृत्यू झालाच नाही. असं कुटुंब ज्यातला एकही जण कधीही मृत्यूमुखी पडला नाही अशा सात घरातून तुला मोहरी आणायची आहे. मुलाच्या प्रेमापोटी कसलाही विचार न करता ती मोहरी आणायला जिकडे तिकडे फिरत होती पण असं कोणतच घर तिला सापडेना जिथे कोणाचा मृत्यू झालाच नाही. ती प्रत्येक घर फिरत होती कोणाची आई कोणाचा भाऊ,मुलगी, वडिल एवढंच नाही तर कोणाचं तान्ह बाळ सुद्धा हे जग सोडून गेलं होतं. शेवटी ती थकली आणि दुखी मनाने बुद्धांजवळ आली.
बुद्धांना तिने घडलेली सगळी हकिकत सांगितली. तेव्हा बुद्ध म्हणाले मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचं चक्र आहे. ते प्रत्येक सजीवाला अटळ आहे. या जगात फक्त तू एकटीच नाही असे खूप जणं आहे. ज्यांनी आपल्या जवळची व्यक्ती गमावली. खरंतर मृत्यू म्हणजे सुटका. जर एखादी व्यक्ती खूप काळापासून आजाारी आहे तिला त्या वेदना सहन होत नाही अशावेळी आलेला मृत्यू म्हणजे दुख नाही तर त्या माणसाची वेदनेतून झालेली सुटका असते. असं बुद्धांनी त्या म्हातारीला पटवून दिलं. शेवटी त्या म्हातारीने तिच्या मुलाला झालेला मृत्यू स्विकारला आणि बुद्धांजवळ तिने कृतज्ञता व्यक्त केली. अशाच नवनविन गो्ष्टींसाठी नवराष्ट्रला फोलो नक्की करा.






