बुद्ध जंगलाच्या दिशेने जाऊ लागले बघता बघता अंधार पडला. तेव्हाच अंगुलीमाल त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. बुध्द घाबरले नाही. अंगुलीमाल बुध्दांना म्हणाला की, तुझ्याकडे जे काही असेल तर मला दे. नाहीतर मी तुला मारुन टाकेल. बुध्दांनी शांततेत उत्तर दिले, माझ्याकडे तर काहीच नाही, मी तर एक भिक्षुक आहे, लोकांकडे भिक्षा मागून पोट भरतो. तुला मी काय देणार? त्यानंतर अंगुलीमाल बुद्धांना म्हटला जर तुझ्याकडे काही नाहीये तर मग आता मरायला तयार हो. बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे. त्यावेळी बुद्ध बोलले, तुला जमेल ? त्यावर अंगुलीमाल म्हणाला मला सगळं शक्य आहे कारण मी सर्वशक्तीशाली आहे. बुद्ध म्हणाले, जा त्या झाडाची फांदी तोडून आण. अंगुलीमालने तोडून आणली. त्यानंतर बुद्ध म्हणाले जा आता ती फांदी पुन्हा झाडाला जोडून ये.
अंगुलीमालला राग आला तो म्हणाला एकदा फांदी तोडली तर ती जोडता येत नाही. बुद्ध म्हणाले मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ते तुला जोडता येत नाही ते तोडण्याचा तुला हक्क नाही. आजवर तु अनेक निरपराध लोकांचा जीव घेतलास पण तुला जर त्यांना जीवनदान देता येत नाही तर तुला जीव घेण्याचा अधिकार नाही. अंगुलीमाल भानावर आला बुद्धांच्या या एका वाक्याने तो बुद्धांना शरण केला. बुद्धांची माफी मागितली आणि त्यांचं शिष्य़त्व स्विकारलं. असा एक गुंड ज्याला बुद्धांनी माणसात आणलं.






