फोटो सौजन्य- pinterest
सूर्याचे शुभ रत्न माणिक्य मानले जाते. हे रत्न लाल किंवा गुलाबी रंगांचे असते. या रत्नाला परिधान करताना सोनं किंवा तांब्यामध्ये परिधान केल्याने त्या व्यक्तीला राजयोगाची प्राप्ती होते. कुंडलीमधील सूर्याचा दोष दूर होतो तसेच व्यक्तीची कीर्ती आणि प्रतिष्ठा देखील वाढते. त्याचप्रमाणे व्यक्तीला कामामध्ये यश मिळते. माणिक्य रत्न परिधान केल्यास आत्मविश्वास, नेतृत्वशक्ती आणि मानसिक बळ मिळते. नेते, अधिकारी, राजकारणी, प्रशासकीय सेवेत असलेले लोक जास्तकडून माणिक्य रत्न परिधान करतात. माणिक्य रत्न परिधान करण्याची पद्धत कोणती आणि त्याचे फायदे कोणते, जाणून घ्या
माणिक्य रत्न हे परिधान करताना सोनं किंवा तांब्यामध्ये करावे. अनामिका हे सूर्याचे बोट समजले जाते. त्यामुळे उजव्या हाताच्या अनामिका बोटात माणिक्य रत्न परिधान करणे शुभ मानले जाते. शक्यतो रविवारी सकाळी 5 ते 7 या वेळेदरम्यान माणिक्य रत्न परिधान करावे. परंतु ते परिधान करण्यापूर्वी माणिक आणि सूर्य देवाची पूजा करावी. हे रत्न परिधान करताना गंगाजलाने रत्न शुद्ध करुन घ्या त्यानंतर ‘ओम ह्रीम ह्रीम ह्रोम सह सूर्याय नमः’ या मंत्रांचा 108 वेळा जप करत परिधान करावे. दरम्यान, हे परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
माणिक्य रत्न परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतो. तसेच त्यांच्यामधील नकारात्मकता निघून जाते. तसेच त्यांना शक्ती आणि धैर्य यांचा अनुभव येतो.
जो व्यक्ती योग्य पद्धतीने माणिक्य परिधान करतो त्याच्या जीवनात कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळते. त्याचप्रमाणे नजरदोषांपासून देखील त्याची सुटका होते तसेच त्याच्या मनातील गोंधळ, शंका आणि अनिश्चितता देखील संपून जाते, असे मानले जाते.
असे मानले जाते की, माणिक्य परिधान केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते. हृदय, डोळे आणि रक्ताशी संबंधित असलेल्या समस्या व्यक्तीला फायदेशीर ठरु शकतात.
माणिक्य रत्न सूर्याचे असल्याने ते परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात राजयोग निर्माण होतो. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळते. तसेच तुमची अडकलेली कामे पूर्ण होतात. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सूर्य दोष नाहीसा होतो.
माणिक्य परिधान करताना सरकारी कामात यश मिळते. तसेच तुम्हाला वडिलांकडून काम पूर्ण करण्यासाठी पाठिंबा मिळू शकतो. अडीअडचणीच्या वेळी तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मदत मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)