ज्योतिष शास्त्रात राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हटलं जातं. यापैकी केतू हा मागील जन्मातील कर्म, अनुभव आणि अपूर्ण इच्छा दर्शवतो, तर राहू हा या जन्मातील महत्त्वाकांक्षा आणि अपूर्णतेची जाणीव दाखवतो. कुंडलीतील केतूची स्थिती, तो ज्या भावात आहे आणि ज्या राशीत आहे, त्यावरून व्यक्तीच्या मागील जन्मातील प्रवृत्तींचा अंदाज बांधला जातो.
उदाहरणार्थ, जर केतू पाचव्या भावात असेल तर त्या व्यक्तीला आध्यात्मिक ओढ, पूर्वजन्मीचे संस्कार किंवा एखाद्या कलेत नैसर्गिक प्रावीण्य असू शकते. बाराव्या भावातील केतू मोक्ष, परदेश किंवा एकांताशी संबंधित अनुभव सूचित करतो. काही वेळा एखाद्या गोष्टीची अनाकलनीय भीती, विशिष्ट ठिकाणाशी जुळलेपण किंवा काही नात्यांमध्ये लगेच निर्माण होणारी जवळीक—हीही मागील जन्मातील कर्मबंधनाची चिन्हं मानली जातात.
तथापि, हे सर्व श्रद्धा आणि ज्योतिषीय परंपरेवर आधारित आहे. याला ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत. तरीही अनेक जण आपल्या कुंडलीच्या अभ्यासातून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतात.शेवटी, मागचा जन्म काहीही असो, वर्तमानकाळात केलेली चांगली कर्मं आणि योग्य निर्णय हेच भवितव्य घडवतात,असंही ज्योतिष सांगतं. हेच राशीनुसार कसं घडतं ते जाणून घेऊयात.
मेष रास
धाडसी आणि तेजस्वी असणारी ही मंडळी मागच्या शूर योद्धा असू शकतात असं म्हटलं जातं. तुम्ही स्वत:च्या आधी इतरांचा विचार करता त्यामुळे या जन्मात तुम्ही स्वत:ची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजेत.
वृषभ
या राशीच्या मंडळींनी मागच्या जन्मी कलाकार किंवा शेतीव्यवसाय करणाऱ्या कुटुंबात जन्म घेतला असावा. या जन्मात तुम्ही स्वत:च्या हट्टीपणावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
मिथुन
मगाच्या जन्मातील छबी या जन्मात देखील दिसून येते. मिथुन राशीची मंडळी मागच्या जन्मी लेखक किंवा शिक्षक असावेत असं म्हटलं जातं.
कर्क
कर्केची मंडळी मागच्या जन्मी समाजसेवक किंवा केयर टेकर या क्षेत्रात असावेत. म्हणूनच ही माणसं आपल्या माणसांची प्रेमाने आपुलकीने काळजी घेतात.
सिंह
सिंह राशीत जन्माला आलेली माणसं मागच्या जन्मी बहुप्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असावेत.या जन्मात तुम्हाला स्वत: कोणत्याही गोष्टीचा गर्व होणार नाही याची खबरदारी घ्य़ायला पाहिजेत.
कन्या
कन्या राशीत जन्मलेली मंडळी त्यांच्या आधीच्या जन्मात गणिततज्ज्ञ किंवा डॉक्टर असू शकतात. म्हणूनच ही मंडळी फार घोळक्यात वावरणारी नसतात.
तूळ
तूळेची मंडळी मागच्या जन्मी न्यायाधीश किंवा कलाप्रिय आयुष् जगलेली असतात. या जन्मात त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवून वाटचाल करणं गरजेचं आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीचा केतू प्रभावी असतो त्यामुळे यांना कधी कधी मागच्या जन्माचा संबंध या जन्मी जाणवतो. ही माणसं गत जन्मात गुढ विद्या करणारे असतात. या जन्मात यांनी एखाद्यावर राग धरुन ठेवणं टाळावं.
धनु
गुरु बळकट असणारी ही माणसं मागच्या जन्मात तत्वज्ञानी असावित असं म्हटलं जातं. ही माणसं कायम ज्ञान वाटतात.
मकर
मागच्या जन्मी कोणाला दुखावलं असलं किंवा चुकीच्या गोष्टी केल्या की या जन्मात ही माणसं मकर राशीत जन्म घेतात असं म्हटलं जातं. यांचा देखील स्वामी शनी आहे. ही मंडळी फार कष्टाळू असतात शनी यांना संयम आणि मेहनत शिकवतो.
कुंभ
ही माणसं मागच्या जन्मी प्रवाहाच्या विरुद्ध चालणारी असावीत असं म्हटलं जातं. या जन्मात यांनी जवळच्या माणसांबाबत जिव्हाळा ठेवणं गरजेचं आहे.
मीन
मागच्या जन्मातूनच यांना या जन्मी अध्यात्मिक ओढ आलेली असते. मीन राशीत जन्माला आलेली मंडळी मागच्या जन्मी संत साधू असतात असं म्हटलं जातं.






