फोटो सौजन्य- istock
नोव्हेंबर महिना ग्रह नक्षत्रांसाठी खूप खास असणार आहे. नोव्हेंबर महिन्यात काही मोठ्या ग्रहांच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. कोणता ग्रह बदलणार आपली हालचाल आणि त्याचा प्रभाव कोणत्या राशींवर पडणार ते जाणून घेऊया.
नोव्हेंबर महिना ग्रह नक्षत्रांसाठी खूप खास असणार आहे. नोव्हेंबर महिन्यात काही मोठ्या ग्रहांच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव मेष राशीपासून मीन राशीच्या लोकांवर पडेल. ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबरमध्ये सूर्य, गुरु, शुक्र व बुध आपल्या स्थितीमध्ये बदल करणार आहेत. या ग्रहांचा परिणाम काही राशीच्या लोकांवर शुभ तर काही राशीच्या लोकांवर अशुभ राहील. नोव्हेंबर महिन्यात ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्याने कोणत्या राशींना सर्वांत जास्त फायदा होईल जाणून घ्या
देवगुरु बृहस्पति 28 नोव्हेंबरला मृगशिरा नक्षत्रातून निघून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. गुरु नक्षत्र गोचर दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी असेल. गुरु नक्षत्राचा शुभ प्रभाव मेष, मिथुन, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांवर असेल. गुरुच्या प्रभावामुळे तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीची चिन्हे आहेत.
हेदेखील वाचा- तुम्ही कोरल रत्न धारण केले आहे का? परिधान करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, कोणाला फायदा आणि कोणाचे नुकसान
ग्रहांचा राजकुमार बुध 26 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीमध्ये
वृश्चिक राशीत जाणार आहे. हे संक्रमण सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी होईल. बुधाचा कर्क, कन्या, धनु, मकर आणि मीन राशीवर जास्त प्रभाव असेल. त्यानंतर बुध 30 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत जाईल. बुध रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी जाईल. बुधाचा सर्वाधिक प्रभाव मेष, सिंह, धनु व वृष्चिक राशींवर राहील. यादरम्यान या राशीच्या कोणत्याही लोकांना जोखीम न घेण्याचा सल्ला दिला जातो.
शुक्र 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 3 वाजून 39 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. शुक्राचे संक्रमण मेष, वृषभ, सिंह, तूळ, मकर, कुंभ व मीन राशींसाठी फायदेशीर राहील.
हेदेखील वाचा- घर कधी पुसू नये, महिलांनी या गोष्टींकडे द्यावे विशेष लक्ष
सूर्य 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत सकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी प्रवेश करेल. सूर्याचे संक्रमण मेष, सिंह, वृश्चिक, धनु, मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. या वेळी तुम्हाला नोकरी, व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.
नोव्हेंबरमध्ये शनि राशी संक्रमणात नाही तर आपल्या राशीत बदल करेल. शनि या वेळी उलटी चाल चालेल. 15 नोव्हेंबर रोजी शनिमार्गी साधी चाल चालेल. न्याय देवता व कर्म फलदाता शनिदेव 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी आपल्या राशीतून कुंभ राशीत जाईल.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)