रंगांच्या उधळणीसाठी सज्ज व्हा! होळी पार्टीसाठी घराची अशी करा आकर्षक आणि रंगीत सजावट, पाहुणेही होतील खुश
राज्यासह संपूर्ण देशभरात होळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात होळी सणाला खूप जास्त महत्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. एकमेकांना रंग लावून हा रंगपंचमी मोठ्या आनंदात साजरा केली जाते. होळीसाठी आपण अनेक ठिकाणी पार्टीला जात असतो तर आपल्या घरीही पार्टी करत असतो. तुम्ही यावर्षी तुमच्या घरी होळी पार्टी करणार असाल आणि होम डेकोरेशन नक्की कसे करायचे असा प्रश्न पडला असेल तर घराची सजावट अगदी सोप्या पद्धतीने करा. काही सोप्या होम डेकोरेशन टिप्स तुम्ही ट्राय करु शकता.(फोटो सौजन्य – istock)
सण कोणताही असो फुलांची सजावट कधीच चुकीची ठरत नाही. तुमच्याकडे कमी वेळ असेल तर फुलं हा उत्तम पर्याय ठरतो. होळीच्या रंगबेरंगी सणाला रंगबेरंगी फुलांची सजावट करावी. तुमचे घर सकारात्मक दिसते आणि होळीचा जल्लोषही दिसून येतो. तसंच फुलांच्या सुगंधाने घर मोहरून जाते. याशिवाय तुम्ही आर्टिफिशियल फुलांचाही आधार घेऊ शकता.
होळीच्या सणाला तुम्ही घराच्या भिंती सजविण्यासाठी वॉलपेपरची मदत घेऊ शकता. ऑनलाईन ऑर्डर करू शकता अथवा वेळ नसेल तर स्टोअर्समधून वॉलपेपर्स आणून तुम्ही सजवू शकता. तसंच होळीसाठी तुम्ही लाईट कलर वॉलपेपर आणा आणि मग भिंती सजवा.
होळीसाठी घराला वेगळा लुक देण्यासाठी तुम्ही घरातील पडदे आणि उशांची कव्हर्स बदला. होळीच्या सणासाठी फ्लोरल प्रिंट्स, Abstract Prints असणारे पडदे निवडा, तसंच सोफा कव्हर्स आणि रंगबेरंगी बेडशीट्सचा वापर करा. यामुळे घर अधिक आकर्षक दिसते आणि होळीच्या डेकोरेशनचा वेगळाच फील येतो.
होळीसाठी घरात रंगबेरंगी लुक देण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे फुगे. तुमच्याकडे वेळ नसेल तर घराची सजावट करण्यासाठी रंगबेरंगी फुग्यांची मदत घ्या. मुख्य दरवाजापासून ते खिडक्या, भिंतींवर तुम्ही फुग्यांनी सजवू शकता. वेगवेगळ्या पद्धतीचे फुगे आजकाल मिळतात. त्याचा वापर करून घ्या.
होळी खेळायला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘या’ गोष्टी, हानिकारक रंगाच्या साईड इफेक्टपासून राहाल दूर
वॉल हँगिंग्जचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने घर सजवू शकता. होळीसाठी जर तुम्हाला क्राफ्टवर्क येत असेल तर वॉल हँगिंग्ज करणे अधिक सोपं होईल. कलरफुल सैंड पेपर्स बनविण्यापासून ते बी आणि फेदर्सचा वापर करून घराला वेगळा लुक देऊ शकता.






