अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस... सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये
Vivo Y50s 5G स्मार्टफोन 6GB + 256GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB अशा तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB + 256GB कॉन्फिगरेशनची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 23,300 रुपयांपासून सुरु होते. तर 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 25,800 रुपये आणि टॉप-एंड 12GB + 256GB ऑप्शनची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 30,000 रुपये आहे. Vivo Y50e 5G सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 1,499 म्हणजेच सुमारे 19,300 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये डायमंड, स्काई ब्लू आणि प्लेटिनम (चीनी भाषेतून अनुवादित) कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही डिव्हाईस चीनमध्ये विवोच्या वेबसाईटद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vivo Y50s 5G आणि Vivo Y50e 5G मध्ये 6.74-इंच HD+ (1,600×720 पिक्सेल) फ्लॅट LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे. दोन्ही स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Vivo Y50e 5G मध्ये 6GB रॅम आणि 128GB eMMC 5.1 इनबिल्ट स्टोरेज आहे, तर Vivo Y50s 5G मध्ये 256GB पर्यंत फास्ट UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज आणि 12GB पर्यंत रॅम सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हे हँडसेट Android 15-बेस्ड OriginOS 5 सह उपलब्ध आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Vivo Y50s 5G आणि Vivo Y50e 5G मध्ये ऑटोफोकससह 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे आणि 1080p पर्यंत व्हिडीओ रिकॉर्डिंगचा सपोर्ट आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये डुअल सिम सपोर्ट, 5G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.4, मल्टी-सिस्टम GPS आणि एक USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. एडिशनल फीचर्समध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि एक इंफ्रारेड रिमोट कंट्रोल समाविष्ट आहे.
Vivo Y50s 5G आणि Vivo Y50e 5G या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y50e 5G मध्ये 15W चार्जिंग सपोर्ट आणि Vivo Y50s 5G मध्ये फास्ट 44W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये OTG रिवर्स चार्जिंग सपोर्ट आहे. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि हे फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग आहे.
Ans: Vivo फोन Flipkart, Amazon, Vivo India वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहेत.
Ans: होय, Vivo ने X Fold सीरिज भारतात सादर केली असून ती प्रीमियम सेगमेंटमध्ये येते.
Ans: Vivo फोनमध्ये 5000mAh किंवा त्याहून जास्त बॅटरी, तसेच Fast Charging सपोर्ट मिळतो.






