फोटो सौजन्य- सोशल मीडिया
कालभैरवाष्टमीचा दिवस भगवान शिवाचे भयंकर आणि संरक्षणात्मक स्वरूप असलेल्या कालभैरवाच्या पूजेला समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमी ही काळभैरव जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान कालभैरव प्रकट झाले होते असे मानले जाते. काळभैरव हा काळ आणि मृत्यूचा देव आहे असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा अपमान केला तेव्हा शिवाच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला. कालभैरव हे काशीचे रक्षक मानले जातात आणि त्यांच्या उपासनेने भय, वाईट आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
पंचांगानुसार, मार्गशीर्ष शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी सुरु होईल त्याची समाप्ती शनिवार 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.56 वाजता होईल. पंचांगानुसार प्रदोष काळात कालभैरवाची पूजा शुक्रवार, 22 नोव्हेंबर रोजी केली जाईल.
सकाळी स्नान करून व्रताची प्रतिज्ञा घ्यावी. भगवान कालभैरवाच्या पूजेसाठी स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेचे ठिकाण तयार करा. भगवान शिव आणि काळभैरवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावा. त्यांना तीळ, मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करा. कालभैरव अष्टक किंवा त्याची स्तुती करा. फळे अर्पण करा. आरती करावी. शेवटी क्षमेची प्रार्थनाही करा. काळ्या कुत्र्यांनाही खायला द्या. हे अत्यंत शुभ मानले जाते.
शनि देव संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कालाष्टमीच्या दिवशी उपवास करून अन्न, वस्त्र आणि गरजूंना दान देण्याचे महत्त्व आहे. काशीतील कालभैरव मंदिरात देश-विदेशातून हजारो लोक पूजेसाठी येतात. येथे भक्त भगवान कालभैरवाचे दर्शन घेतात आणि त्यांच्या पापांपासून मुक्तीसाठी आणि कल्याणासाठी त्यांची प्रार्थना करतात.
कालभैरव जयंतीच्या दिवशी जे उपवास करणार आहेत त्यांनी सकाळी उठल्यावर स्नान, ध्यान करून उपवास करण्याचा संकल्प करावा. कालभैरवजींची रात्री पूजा केली जाते, त्यामुळे रात्री पूजास्थळी कालभैरवजींची मूर्ती ठेवून पूजा सुरू करावी. जर तुमच्या घराजवळ कालभैरवजींचे मंदिर असेल तर तेथे जाऊन चार दिशांनी दीप लावून कालभैरवजींची पूजा करू शकता. घरातील पूजास्थानी पूजा करणाऱ्यांनी कालभैरवजींच्या मूर्तीसमोर फुले, पुष्प अर्पण करावे. यानंतर कालभैरव अष्टकमचा पाठ करून मंत्रांचा जप करावा. यानंतर भैरवजींना इमरती, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करू शकता. यासोबतच कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्यांना आणि गरजूंना भाकरी दान केल्याने तुम्हाला फायदा होतो.
चाणक्य नीती संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते. कालभैरवजींची पूजा केल्याने भक्तांना नकारात्मकता आणि अहंकारापासून मुक्ती मिळते. कालभैरव जी नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना वाईटांपासून वाचवतात.
कालभैरवाच्या पूजेने शत्रूंवर विजय प्राप्त होतो. जीवनातील नकारात्मकता आणि भीती नाहीशी होते. मानसिक शांती आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी भगवान कालभैरवांचा आशीर्वाद घेऊन जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा.
ह्रीं उन्मत्त भैरवाय नमः।।
ॐ काल भैरवाय नमः।।
ॐ ह्रीं बं बटुकाय आपदुद्धारणाय कुरूकुरू बटुकाय ह्रीं।।