फोटो सौजन्य- pinterest
2026 मध्ये केतू सिंह राशीमधून संक्रमण करेल. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात केतू राशी बदलेल. केतू वर्षभर सिंह राशीमध्ये राहणार आहे. ज्याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार केतू हा मोक्ष देणारा देखील आहे, म्हणजेच जे काही घडेल त्याचे पूर्ण परिणाम मिळतील. म्हणून, वर्षभर केतू आणि शनि यांच्यात षडाष्टक योग तयार होणे शुभ मानले जात नाही. मेष आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांवर केतूचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
मेष राशीच्या घरामध्ये केतूचे संक्रमण पाचव्या घरामध्ये होणार आहे. याचा परिणाम मुलांशी आणि शिक्षणाशी संबंधित आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना घरगुती कलह आणि मानसिक अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. काही वाद किंवा संघर्षामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. आर्थिक लाभ कमी आणि खर्च जास्त असेल. मुलांशी संबंधित बाबींबद्दल तुमचे मन अस्वस्थ राहील.
वृषभ राशीच्या चौथ्या घरामध्ये केतूचे संक्रमण होत आहे. घर, कुटुंब, वाहन आणि मालमत्तेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हा काळ वृषभ राशीच्या लोकांच्या अडचणीमध्ये वाढ करु शकता. यावेळी कौटुंबिक जीवनात तणावाचे वातावरण राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण बाराव्या घरात होणार आहे. ज्यामुळे खर्च, रुग्णालये, परदेश आणि लपलेले शत्रू यांच्याशी संबंधित बाबींवर परिणाम होईल. या काळात कन्या राशीच्या लोकांच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अनपेक्षित खर्चामुळे मानसिक ताण येऊ शकतो. या काळात लपलेल्या समस्या देखील उद्भवू शकतात.
धनु राशीच्या घरामध्ये हे संक्रमण नवव्या घरात होत आहे. हे घर नशीब, धर्म आणि प्रवासाचे प्रतिनिधित्व करते. या काळात धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कामात अडथळे येतील आणि खर्चही जास्त असेल. गाडी चालवताना जास्त काळजी घ्या. अपघातात दुखापत होण्याची शक्यता आहे. या काळात प्रवास करणे टाळावे.
कुंभ राशीच्या घरामध्ये हे संक्रमण सातव्या घरामध्ये होत आहे. तुमच्या जोडीदारासोबत तणाव आणि लग्नात विलंब यासारख्या समस्या निर्माण करू शकतात. या काळात कौटुंबिक समस्या देखील वाढू शकतात. नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यामधील संघर्ष वाढू शकतो. ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. वाहन किंवा प्रवासाशी संबंधित खर्च होण्याची शक्यता देखील आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: केतूचा प्रतिकूल परिणाम मेष, कुंभ, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर असणार आहे
Ans: केतू भ्रम, गोंधळ आणि अचानक घडामोडीचा कारक आहे. त्यामुळे चुकीचे निर्णय, गुंतवणुकीत नुकसान, अडकलेले व्यवहार किंवा कायदेशीर अडथळे असू शकतात
Ans: केतूचे संक्रमण साधारणपणे 1.5 वर्षे एकाच राशीत राहते. त्यामुळे त्याचा प्रभावही याच काळात जाणवतो.






