फोटो सौजन्य- pinterest
आज, 24 जानेवारी रोजी वर्षातील पहिली स्कंद षष्ठीचे व्रत आहे. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पुत्र कार्तिकेय याला समर्पित आहे. धार्मिक पंचांगानुसार, स्कंद षष्ठी व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी पाळले जाते. दक्षिण भारतातील लोक प्रामुख्याने दर महिन्याला हे व्रत पाळतात. असे मानले जाते की या शुभ दिवशी स्कंद षष्ठीचा उपवास आणि भगवान कार्तिकेयची पूजा केल्याने धन आणि समृद्धी मिळते, तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मिळतो. स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेयची पूजा करण्यासाठी मुहूर्त, पूजा पद्धत आणि व्रताचे नियम जाणून घ्या
स्कंद षष्ठीच्या दिवशी सूर्योद्य सकाळी 7.13 वाजता होईल. तर सूर्यास्त संध्याकाळी 5.54 वाजता होईल. या दिवशी ब्रम्ह मुहूर्त सकाळी 05:26 ते 06:20 पर्यंत असेल. सकाळी संध्याकाळी – 5.53 ते 7.13 पर्यंत असेल. अभिजित मुहूर्त – दुपारी 12.12 ते दुपारी 12.54, विजय मुहूर्त – दुपारी 2:20 ते दुपारी 3:02 पर्यंत, संधिप्रकाश मुहूर्त – संध्याकाळी 5:50 ते संध्याकाळी 6:17 पर्यंत असेल.
सकाळी लवकर उठून गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करा. त्यानंतर स्वच्छ लाल, पिवळे किंवा निळ्या रंगांचे कपडे परिधान करा. हातात पाणी घ्या आणि उपवास करण्याचे व्रत घ्या. घरातील देव्हाऱ्यात कार्तिकेयची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. भगवान कार्तिकेयांच्या मूर्तीला दूध, दही, साखर, तूप आणि मधाने स्नान घाला. तसेच त्यांना चंदनाचा लेप, हळद, कपडे, फुले, फळे, मोरपंख आणि मिठाई अर्पण करा. शुद्ध तुपाचा दिवा लावून मंत्राचा जप करावा. कांड षष्ठी कवचम् यांचे पठण करा. आरती करून पूजेची सांगता करा. संध्याकाळी, पुन्हा भगवान कार्तिकेयची पूजा करा.
धार्मिक श्रद्धेनुसार, स्कंद षष्ठी व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. सकाळच्या प्रार्थनेदरम्यान एक प्रतिज्ञा घेतली जाते. तर संध्याकाळी भगवान कार्तिकेयची पूजा करून आणि चंद्र देवाला जल अर्पण करून उपवास सोडला जातो. उपवासाच्या काळात फक्त फळे आणि दूधच सेवन केले जाते; इतर गोष्टी खाणे पाप मानले जाऊ शकते.
शत्रूंवर विजय मिळतो.
आरोग्य चांगले राहते.
ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो.
तुमच्या आयुष्यात समृद्धी येते.
तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य लाभते.
नवविवाहित जोडप्यांना मुलांचे आशीर्वाद मिळतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: माघ महिन्यातील पहिले स्कंद षष्ठी व्रत 24 जानेवारी 2026 रोजी आहे
Ans: हा व्रत भगवान कार्तिकेयाला समर्पित आहे, ज्यामुळे भक्तांना शत्रू बाधा दूर होणे, साहस वाढणे, मनोबल मिळणे आणि कुटुंब व करिअरमध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते अशी मान्यता आहे
Ans: भीती आणि अडथळे दूर होणे कुटुंबात सुख, आरोग्य व समृद्धी शक्ती, आत्मविश्वास व निर्भयता वाढणे






