रिलीजपूर्वीच Mardaani 3 वर सेन्सॉरची कात्री! राणी मुखर्जीच्या चित्रपटात झाले मोठे बदल (Photo Credit- X)
हा चित्रपट येत्या ३० जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या अटी पूर्ण केल्यावरच चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. या बदलांमुळे चित्रपटाच्या कथानकावर किंवा संवादांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Xclusiv… ‘MARDAANI 3’ RUN TIME… #Mardaani3 certified ‘UA 16+’ by #CBFC on 14 January 2026. Duration: 130.37 min:sec [2 hours, 10 min, 37 sec]. #India ⭐ Theatrical release date: 30 January 2026. pic.twitter.com/OU8HXJQmfJ — taran adarsh (@taran_adarsh) January 23, 2026
१. ड्रग डिस्क्लेमर: अमली पदार्थांच्या संदर्भातील वैधानिक इशारा (Disclaimer) चित्रपटात जोडण्यात आला आहे.
२. संवादात बदल: एका महत्त्वाच्या संवादातून ‘बच्ची’ हा शब्द हटवून त्याऐवजी ‘लड़की’ असा बदल करण्यात आला आहे.
३. वय पडताळणी: संबंधित दृश्यात काम करणाऱ्या बालकलाकाराच्या वयाचे अधिकृत पुरावे बोर्डात सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
४. हिंसाचाराच्या दृश्यांवर कात्री: एका दृश्यात मुलीला थोबाडीत मारताना दाखवण्यात आले होते, त्या दृश्यात फेरबदल (Modify) करण्यात आले आहेत.
५. अपशब्द म्यूट: आईबद्दल वापरण्यात आलेले अपशब्द सेन्सॉर बोर्डाने म्यूट केले आहेत.
६. इंग्रजी सबटायटल्समध्ये बदल: इंग्रजी सबटायटल्समधील ‘Whore’ या शब्दाऐवजी आता ‘Traitor’ हा शब्द वापरला जाणार आहे.
७. अश्लील शब्द हटवले: लैंगिक अवयवांशी संबंधित आक्षेपार्ह शब्दांना कात्री लावण्यात आली आहे.
८. देशांची नावे वगळली: एका दृश्यात अनेक देशांची नावे घेण्यात आली होती, ती नावे काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
९. भारत सरकारचा संदर्भ: भारत सरकारबद्दल वापरलेले नकारात्मक संदर्भ असलेले शब्द बदलण्यात आले आहेत.
१०. महत्त्वाची माहिती (Information Strips): महिला आणि बाल तस्करीशी संबंधित कायदेशीर माहिती असलेल्या पट्ट्या (Text Strips) चित्रपटात जोडण्यास सांगण्यात आले आहे.
‘मर्दानी’ आणि ‘मर्दानी २’ च्या तुफान यशानंतर तिसऱ्या भागात राणी मुखर्जी कोणत्या सामाजिक विषयावर प्रहार करणार, याची उत्सुकता होती. तस्करी आणि गुन्हेगारी विश्वाचे दाहक वास्तव मांडणाऱ्या या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कडक नजर ठेवली आहे.
श्रद्धा, तर्क आणि परंपरेचा संगम; ‘देवखेळ’ मध्ये प्राजक्ता साकारणार अनोखी भूमिका, सांगितला अनुभव






