फोटो सौजन्य- istock
विंड चाइममुळे घरातील नकारात्मकता दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तू दोष दूर होतो. घर प्रसन्न राहातं, त्यातून येणाऱ्या मधूर आवाजमुळे घरातील नकारात्मक भाव दूर होतात. घर प्रसन्न राहातं.
फेंगशुईमध्ये विंड चाइमला सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. विंड चाइम जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर करून सुख-समृद्धी आणतात असे मानले जाते.फेंगशुईच्या मते, विंड चाइम्सद्वारे, तुम्ही तुमच्या आजूबाजूला वाहत असलेल्या नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर होते.विंड चाइम वेगवेगळ्या धातू आणि पद्धतींनी बनलेले असतात. फेंगशुईमध्येही त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत.
फेंगशुईनुसार दुष्ट आत्मा दूर करण्यासाठी घरात विंड चाइम लावणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, गोड आवाज कौटुंबिक जीवनात सकारात्मक ऊर्जा देतात आणि नकारात्मकतेपासून मुक्ती देतात. विंड चाइम्सचा मधुर आवाज संपत्ती, आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. मात्र, घरात विंड चाइम लावताना फेंगशुईच्या काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत अनिवार्य मानले जाते. घर किंवा ऑफिसमध्ये विंड चाइम लावताना दिशेची विशेष काळजी घ्यावी. असे मानले जाते की विंड चाइम चुकीच्या दिशेने ठेवल्यास नकारात्मक परिणाम होतात. घरात विंड चाइम लावण्यासाठी फेंगशुई टिप्स जाणून घेऊया.
फेंगशुई टिप्स
फेंगशुईनुसार, चांदीच्या रंगाच्या पाच रॉडसह धातूपासून बनवलेले विंड चाइम घराच्या पश्चिम दिशेला लावावेत. यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक शांती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
हेदेखील वाचा- वास्तुशास्त्रानुसार तुमचे घर कसे असावे? जाणून घ्या
सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचे धातूचे विंडचाइम घराच्या किंवा खोलीच्या उत्तर-पश्चिम दिशेला लावावेत. असे मानले जाते की, यामुळे कुटुंबातील सदस्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील आणि परदेशात जाण्याची शक्यता आहे.
पूर्व, दक्षिण-पूर्व किंवा दक्षिण दिशेला लाकडापासून बनवलेले विंड चाइम लावणे उत्तम मानले जाते. दक्षिण-पूर्व दिशेला लाकडी विंड चाइम लावल्याने धनसंपत्ती मिळते आणि कौटुंबिक जीवन सुखी राहते, असे म्हटले जाते.
याशिवाय घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला सिरॅमिक विंड चाइम लावू शकता.
दिशा लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या कोणत्याही दरवाजाजवळ किंवा खिडकीजवळ विंड चाइम लावू शकता.
हेदेखील वाचा- मूलांक 6 असलेल्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया
विंड चाइम्सचे महत्त्व
फेंगशुईनुसार काही वस्तू घरात ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते आणि घरातील लोकांचे नाते चांगले राहते. विंड चाइम्स किंवा विंड बेल्स हे फेंगसुई उपायांशी संबंधित असेच एक सुंदर वाद्य आहे, जे घरात लावल्याने आजूबाजूला निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. वारा वाहत असताना विंड चाइम्सच्या घंटा एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यातून निघणारा मधुर आवाज मनाला शांती देतो.