फोटो सौजन्य- pinterest
जन्माष्टमीच्या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. हा सण सर्वत्र उत्साहात साजरा करतात. यावेळी भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रामध्ये मध्यरात्री झाला होता. लोक या दिवसाची आधीपासून तयारी करतात. त्यासाठी लोक घरामध्ये किंवा मंदिरामध्ये आधीच मंदिरे भव्य पद्धतीने सजवली जातात. तसेच तुम्ही कान्हाचा पाळणा घरी किंवा मंदिरामध्ये सजवताना काही गोष्टीच्या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला त्याचे शुभ परिणाम मिळू शकतात. तसेच त्या व्यक्तीचे भाग्य देखील चमकू शकते. जन्माष्टमीच्या दिवशी देव्हारा किंवा मंदिर सजवण्यामागचे वास्तू नियम
जन्माष्टमीच्या दिवशी भाविक आपल्या घरात विविध प्रकारे पाळणा सजवतात. त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार, देवतेची स्थापना करताना योग्य दिशेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लड्डू गोपाळाचा पाळणा उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. जर हे शक्य नसल्यास तुम्ही हा पाळणा पूर्व दिशेला देखील ठेवू शकता. मात्र उत्तर दिशेला सुख, समृद्धी, प्रगती आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिशेला मूर्ती ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी राहते.
जन्माष्टमीच्या दिवशी लड्डू गोपाळाची मूर्ती तुम्ही आणणार असाल तर ती मूर्ती खूप मोठी नसावी याची विशेष काळजी घ्यावी. कारण घरामध्ये खूप मोठ्या आकाराच्या देवी-देवतांच्या मूर्ती ठेवणे शुभ मानले जात नाही. ज्यावेळी घरामध्ये तुम्ही ही मूर्ती आणता तेव्हा तिची उंची 2 ते 3 इंच इतकी असावी म्हणजे बाल गोपाळची मूर्ती असणे खूप शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतात.
हिंदू धर्मात जन्माष्टमीच्या दिवशी पाळणा झुलवण्याची फार पूर्वीपासून परंपरा आहे. यावेळी पाळणा झुलवताना तुमचे तोंड उत्तर दिशेला असायला हवे. ते शक्य नसल्यास तुमचे तोंड पूर्व दिशेला करावे. कारण वास्तूनुसार या दिशा खूप शुभ आहेत. रात्रीच्या वेळी बालगोपालाचे तोंड उत्तरेकडे ठेवून पाळणा देताना मूर्तीचे तोंड स्वतःकडे असावे.
जन्माष्टमीच्या दिवशी मंदिर किंवा देव्हाऱ्यातील पाळणा सजवताना या चुका करणे टाळा. पूजेमध्ये काळ्या रंगाचा वापर निषिद्ध मानला जातो. त्यामुळे मंदिर किंवा देव्हारा सजवताना काळा किंवा खूप गडद रंग वापरू नका. त्याऐवजी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी इत्यादी शुभ रंगांचा वापर करू शकता.
श्रीकृष्णांना मोरपंख आणि बासरी खूप आवडते. म्हणून जन्माष्टमीची सजावट करतेवेळी या गोष्टींचा समावेश करु नका. मान्यतेनुसार, लड्डू गोपाळाच्या उजव्या हातात बासरी आणि मोरपंख ठेवावे. यामुळे घरातील सदस्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. तसेच तुमचे नशीब देखील चमकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)