फोटो सौजन्य- pinterest
आजचा 31 ऑगस्टचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खास असेल. तर काही तर राशींच्या लोकांना चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. आज सर्वत्र गौरीचे आगमन होणार आहे. तसेच ग्रहांचे संक्रमण देखील होईल. 4 अंकांचा स्वामी ग्रह राहू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव राहील. आजचा रविवारचा स्वामी ग्रह सूर्य आहे त्यांचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक बदलांना सामोरे जावे लागेल. तसेच कोणावरही विश्वास ठेवू नये. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे मन अस्वस्थ राहू शकते. यावेळी ध्यान करणे चांगले राहील. कामाच्या ठिकाणी काही तरी नवीन शिकाल आणि अपेक्षित बदल होऊ शकतात. कुटुंबामध्ये आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये आजचा दिवस खूप चांगला राहू शकतो. घरामध्ये तणावाची स्थिती उद्भवू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी चढ उतार जाणवेल त्यामुळे तुम्ही त्रस्त राहू शकता.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात शांत राहून नवीन योजना आखू शकतात. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यामुळे मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आत्मविश्वास बाळगावा लागेल. प्रगती होईल. व्यवसायात काही योजना अपूर्ण राहू शकतात. अशा वेळी तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. प्रत्येक परस्थितीशी तोंड देता आले पाहिजे. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या बुद्धी आणि समजदारीने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय भावूक होऊन घेऊ नका. नाहीतर नुकसान होऊ शकते. तुमच्यावरील तणाव कमी होईल. कामाच्या ठिकाणी काही नवीन काम करण्याची तुम्हाला संधी मिळू शकते.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामन्यापेक्षा चांगला राहील. कामाच्या ठिकाणी प्रत्येक काम करण्यात आनंद राहील. प्रकल्पाच्या वेळी घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. त्यामुळे तुमच्यावरील तणाव कमी होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या व्यतिरिक्त स्वतःसाठी देखील वेळ काढावा. तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)