फोटो सौजन्य- pinterest
मंगळ 7 डिसेंबर रोजी धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. हे संक्रमण संध्याकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी होणार आहे. धनु राशीमध्ये राहून मंगळ 20 डिसेंबर रोजी चंद्रासोबत युती करणार आहे. यामुळे महालक्ष्मी योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि चंद्र यांच्यामुळे तयार होणारा हा योग काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. महालक्ष्मी राजयोग धन, सुख समृद्धी, मान सन्मानाचे प्रतीक आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभापासून ते जीवनामध्ये काही सकारात्मक परिणाम होताना दिसून येतील. त्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. कोणत्या भाग्यशाली राशी आहेत त्या जाणून घ्या
महालक्ष्मी राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी असणार आहे. याच्या प्रभावामुळे कौटुंबिक जीवनामध्ये शांतीचे वातावरण राहील. नातेसंबंधामध्ये असलेले मतभेद दूर होतील. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. भविष्यामध्ये तुम्हाला अपेक्षित फायदा होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. लग्नाचे प्रस्ताव येतील. व्यावसायिकांना फायदा होईल. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा राजयोग फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला नवीन बदलांना सामोरे जावे लागेल. व्यवसाय योजना यशस्वी होतील. तुमच्याकडे लग्नाचा चांगला प्रस्ताव येऊ शकतो. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांना मान्यता मिळेल. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात वाहन किंवा घर खरेदी करु शकता. व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात. या काळात व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील.
मीन राशीच्या लोकांसाठी हा योग उत्साहाचा राहील. तुमच्या कारकिर्दीतील सकारात्मक परिणाम होताना दिसून येतील. व्यवसायात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. मीन राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग खूप शुभ ठरणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ आणि इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रात तुम्हाला नवीन ओळख मिळेल. या काळात नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना इच्छित नोकरी मिळू शकेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मंगळ आणि चंद्र यांची शुभ युती होत असल्यास तयार होणाऱ्या योगाला महालक्ष्मी राजयोग म्हणतात. हा योग धन, यश आणि मानसिक समाधान देणारा आहे
Ans: विशिष्ट तिथींवर मंगळ चंद्राची शुभ युती होताना दिसन येते. ज्यामुळे काही राशीच्या लोकांची प्रगती होऊ शकते.
Ans: महालक्ष्मी राजयोगाचा कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे






