जेमिमा रोड्रिग्स आणि स्मृती मानधना (फोटो-सोशल मीडिया)
DC vs RCB, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला करा किंवा मरा अशी परिस्थिति आहे. दिल्ली संघाने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त २ समानेच जिंकता आले आहेत. तर ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर स्मृती मांनधनाचा आरसीबी संघ चालू हंगामातील ५ पैकी ५ सामने जिंकून प्लेऑफसाठी क्वॉलिफाय झाला आहे. त्यामुळे खरे आजच्या सामन्यात जेमिमा रोड्रिग्सच्या दिल्ली संघासमोर खरे आव्हान असणार आहे.
हेही वाचा : तो आला रे! ‘माही मार रहा है’, ऐकायला तयार रहा! IPL 2026 साठी MS DHONI चा सराव सुरू; VIRAL VIDEO
टॉस जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने सांगितले की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. लाईट्सखाली चेंडू वेगाने येईल आणि दवही पडेल. खेळपट्टी थोडी ताजीतवानी दिसत आहे आणि चेंडू बॅटवर चांगला येत आहे असे वाटते, पण आम्ही जे पाहिले आणि वाचले आहे त्यानुसार, चेंडू थोडा खालीच राहील. त्यामुळे मला वाटत नाही की खेळण्याच्या योजनेत फारसा बदल होईल. आमच्या संघात दोन बदल आहेत – लुसी हॅमिल्टन खेळणार नाही आणि चिनले हेन्री संघात आली आहे, तसेच दीया जखमी आहे आणि मिनू मन्नी परत आली आहे.”
🚨 Toss 🚨@DelhiCapitals have won the toss against @RCBTweets and elected to bowl first in Match 1⃣5⃣ Updates ▶️ https://t.co/LX37VtsnbS#TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvDC pic.twitter.com/RicUI7NUqK — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 24, 2026
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाची कर्णधार स्मृती मानधनाने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा विचार करत होतो. आम्ही आज त्याबद्दल विचार केला, खूप वारा आहे, त्यामुळे दव जास्त पडणार नाही. ही स्पर्धा अशी आहे की, जेव्हा जेव्हा आम्हाला क्षेत्ररक्षण करायचे होते, तेव्हा आम्हाला ती संधी मिळाली नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. आम्ही अजूनही छोट्या गोष्टी योग्य प्रकारे करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आमच्या संघात एक बदल आहे – अरु फिट आहे आणि ती प्रेमाच्या जागी संघात आली आहे.”
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), जॉर्जिया वॉल, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), नदिन डी क्लर्क, राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल
दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (क), मारिझान कॅप, निकी प्रसाद, स्नेह राणा, चिनेल हेन्री, श्री चरणी, नंदनी शर्मा, मिन्नू मणी






