फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार, 28 जुलै रोजी मंगळ ग्रह संध्याकाळी 7.58 वाजता कन्या राशीत संक्रमण करणार आहे. या कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यावर काही राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश आणि गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला विशेष स्थान प्राप्त झाले आहे. मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती असे म्हटले जाते. मंगळ ग्रह हा ऊर्जा, शक्ती आणि धैर्याचा कारक मानला जात असल्याने व्यक्ती जीवनामध्ये निर्भय आणि बलवान बनवतो. मंगळ ग्रह हा एका राशीमध्ये 45 दिवस राहतो. जेव्हा तो आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसतो. यावेळी पुन्हा एकदा मंगळ ग्रह संक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा ग्रह कन्या राशीमध्ये संध्याकाळी 7.58 वाजता संक्रमण करणार आहे. ज्यावेळी हा संक्रमण करेल त्यावेळी त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर सकारात्मक होईल म्हणजे या लोकांना करिअर आणि गुंतवणुकीमध्ये फायदा होईल. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी जाणून घ्या
मंगळ ग्रहाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. या लोकांना व्यवसायामध्ये चांगला नफा मिळेल. तसेच या लोकांची आर्थिक स्थिती सुधारलेली राहील. जमीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमचे कुटुंबासोबतचे नाते पूर्वीपेक्षा आता अधिक चांगले राहील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला फळ मिळेल. या काळामध्ये तुमची प्रगती होईल. या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसायानिमित्त तुम्ही परदेशात जाऊ शकतात.
मंगळ ग्रहाचा कन्या राशीत प्रवेश केल्याने वृश्चिक राशीच्या लोकांचा हा काळ चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना चालू असणाऱ्या समस्येतून सुटका मिळेल. तसेच कुटुंबासोबतचे तुमचे नाते अधिक दृढ राहतील. तुमच्या मनात जुन्या गोष्टींची असलेली भीती दूर होईल. या संक्रमणामुळे तुमची नवीन ओळख होईल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला सुवर्णसंधी मिळतील. गुंतवणुकीतील आर्थिक नफ्यामुळे तुम्ही वाहन किंवा जमीन खरेदी कराल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
मंगळ ग्रहांच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठे बदल होताना दिसून येतील. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात असतील त्यांना नवीन संधी मिळतील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण लवकरच पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना इच्छित ठिकाणी प्रवेश मिळण्याची शक्यता. आरोग्याशी संबंधित ज्या समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होतील. आर्थिकदृष्ट्या हे संक्रमण चांगले असू शकते. नातेसंबंधामध्ये सुधारणा होईल. तसेच तुमच्यावरील असलेला ताण कमी होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)