फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जाणारा सण गुरुपौर्णिमा. यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजी साजरी केली जाते. या दिवशी देवी देवतांसह गुरुची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे.
गुरुपौर्णिमा यंदा 10 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. याशिवाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान करणे आणि मंत्रांचा जप करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या गुरुपौर्णिमेचा दिवस खूप खास मानला जातो.
ग्रहाचा राजा सूर्य आणि ज्ञानाचा कारक मानला जाणारा गुरु हे दोघेही सध्या मिथुन राशीमध्ये विराजमान आहेत. या राशीमध्ये दोघांच्या होणाऱ्या युतीमुळे गुरु आदित्य राजयोग तयार होणार आहेत. गुरु पौर्णिमेला गुरुवारचा दिवस आल्याने हा विशेष योगायोग मानला जातो. काही राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. तर काही लोकांना व्यवसायामध्ये विशेष फायदा होऊ शकतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु आदित्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ होणार, जाणून घ्या
गुरु आदित्य राजयोगाचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांना नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकते. या लोकांची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. या लोकांना करिअरमध्ये चांगले परिणाम होतील. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना अनेक फायदे होतील. तुमचे असलेले ध्येय तुम्ही साध्य करु शकता.
सिंह राशीच्या लोकांना गुरु आदित्य राजयोगामुळे करिअरशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. तसेच या लोकांच्या आरोग्यातही सकारात्मक बदल होताना दिसून येतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. मालमत्तेशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला नफा होईल.
कन्या राशीच्या लोकांना गुरु आदित्य राजयोगाचा चांगला फायदी होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा बढतीची संधी मिळेल. तसेच करिअरमध्ये नवीन योजना आखल्या असल्यास त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. नात्यांमध्ये असलेले मतभेद दूर होतील. व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुधारणा होईल. तसेच कोणत्याही दीर्घकालीन योजनेत केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरु शकेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)