फोटो सौजन्य- istock
आज शुक्रवार 1ऑगस्ट. आजचा स्वामी ग्रह सूर्य असेल. त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर आज सूर्याचा प्रभाव असलेला दिसेल. आज शुक्रवारचा स्वामी ग्रह शुक्र असेल. मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तर मूलांक 6 असलेल्या लोकांना आपल्या अनुभवाचा फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य भेटू शकते. आर्थिक स्थिती स्थिर राहील. आत्मविश्वास वाढलेला राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. मात्र एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. दुसऱ्यांना मदत कराल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक शांती मिळेल. कुटुंबात असलेले मतभेद दूर होतील.तुम्हाला संयम आणि मानसिक संतुलन राखून परिस्थिती हाताळावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आपल्याला आज खूप मेहनत घ्यावी लागेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. मालमत्तेशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित लाभ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना दिवस सामान्य राहील तर व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस चढ उतार जाणवू शकतो.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. सरकारी कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. नियोजित कामे पूर्ण होतील.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी बदल होतील त्याला सामोरे जावे लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला जुन्या कामाच्या पद्धती बदलाव्या लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)