फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांच्या देवतेला सूर्य म्हटले जाते. सूर्य आपली राशी वेळोवेळी बदलत असतो. त्याच्या या बदलामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मविश्वास, आदर, सन्मान, सरकारी काम इत्यादींवर चांगला परिणाम होताना दिसून येतो. सूर्याच्या बदलांचा विविध राशींवर वेगवेगळा परिणाम होताना दिसून येतो. ज्या व्यक्तींना शारिरीक समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते. काहींना सरकारी कामात यश मिळते, तर काहींना समाजात आदर मिळतो. सूर्य आपल्या राशीत कधी बदल करणार आहे आणि त्याचा कोणत्या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, सूर्य देव दर महिन्याला आपली राशी बदलतो. सध्या तो मिथुन राशीमध्ये स्थित आहे मात्र आता तो गुरुवार, 17 जुलै रोजी मिथुन राशी सोडून कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याने त्याचा मित्र असलेल्या चंद्राच्या राशीत प्रवेश केल्याने त्याचे सकारात्मक परिणाम तीन राशींवर होताना दिसून येतील. त्या तीन राशी म्हणजे वृषभ, कर्क आणि कन्या या आहेत.
कर्क राशीमध्ये होणाऱ्या सूर्याच्या संक्रमणाचा वृषभ राशीच्या लोकांवर चांगला परिणाम होणार आहे. तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये यश मिळेल. तसेच नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना अनेक फायदे मिळतील त्यासोबतच त्यांना अनेक संधी उपलब्ध होतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. जे नवीन कामाची सुरुवात करु इच्छितात त्यांना यश मिळू शकते. शारीरिक आणि मानसिक समस्या असलेल्या लोकांची सुटका होऊ शकते. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल.
सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असल्याने कर्क राशीच्या लोकांना याचा विशेष फायदा होणार आहे. या लोकांना नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात मोठे काम होऊ शकते, ज्यामुळे चांगला नफा होईल. तुमच्या कामामुळे समाजात तुमचा आदर वाढेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. जे लोक दीर्घकाळापासून आजारांनी त्रासलेले आहेत त्यांचे आजार दूर होण्यास मदत होईल.
कन्या राशीच्या लोकांवर सूर्याची विशेष कृपा राहील. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. ज्या लोकांची कामे अपूर्ण राहिली आहेत ती पूर्ण होतील. या लोकांच्या जीवनामध्ये आनंद, समृद्धी आणि संपत्ती वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ज्या लोकांना मुलं होण्याची समस्या आहे ती दूर होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)