Budget 2026: अमेरिका ते रशिया... संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या तिजोरीवर; जागतिक अस्थिरतेदरम्यान अर्थसंकल्प बदलणार चित्र? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्याच्या जागतिक अस्थिरता, वाढता भू-राजकीय तणाव, अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ दबावाकडे पाहता भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचे आहे. कारण भारताच्या धोरणात्मक निर्णयांचा या सर्वांवर काय परिणाम घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाणून घेऊयात भारताच्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय दबावांना उत्तर देऊ शकेल का?
भारताच्या 2026 च्या अर्थसंकल्पाच्या आधारे भारत अमेरिकेच्या टॅरिफला पूर्णपणे रद्द करु शकत नाही, परंतु काही प्रमाणात त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. यावेळी भारताने युनियन बजेट 2026 च्या अर्थसंकल्पात सुरधारणा आणि जागतिक दबावांना सामोरे जाण्याचा उपायांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टॅरिफला देखील तोंड देण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे.
यासाठी भारताला निर्यात-आधारित उद्योग आणि उत्पादने वाढवावे लागतील. तसेच कमी खर्च आणि सवलतीच्या उपाययोजना कराव्या लागतील. यासाठी आर्थिक रिझर्व्हस व धोरणात्मक उपाययोजना कराव्या लागतील भारतीय उद्योगांना मजबूत बनवून, आंतरराष्ट्रीय बाजापेठांमधील प्रवेश वाढवून तसेच जागतिक दबावांना सुसंगत धरुन धोरणे आणि उपाययोजना केल्यास भारताला टॅरिफला तोंड देणे शक्य होईल.
भारताने 26 जानेवारी 2026 रोजी युरोपियन युनियनसोबत दीर्घ वाटाघाटीचर्चेनंतर मुक्त व्यापार करार केला आहे. या व्यापार कराराला Mother of All Deals म्हटले जाते. या कारारमुळे दोन्ही बाजूंसाठीू मोठ्या प्रमाणात शुल्क कमी किंवा रद्द केले जाणार आहे. यामुळे अनेक भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळेल. यामध्ये भारताचा अर्थसंकल्प अधिक महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. जीडीपी वाढ आणि रोजगारासाठी निर्यातीत वाढ महत्वाची असून गुतंवणू वाढल्यास India EU FTA करारासाठी फायदेशीर ठरले.
भारताची उद्योग आणि संरक्षण धोरणे अधिक मोकळी आणि खुली असल्यास याचा जागतिक पुरवठा साखळीत भारताला मानाचे स्थान मिळवून देईल. सध्या भारताने संरक्षण खर्चात वाढ केल्याने भारत जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र बनले. यामुळे भारताच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाला चालना मिळेल. यामुळे देखील भारत संरक्षण खर्चात किती वाढ करतो याकडे सर्व जगाच्या नजरा खिळून राहणार आहेत.
भारताचा युरोप, आफ्रिका देशासोबत व्यापार वाढण्याची शक्यता देखील आहे. भारताच्या उत्पादने क्षेत्रातील खर्च वाढीमुले, निर्यात वाढीमुळे पायाभूत सुविधांवर भर दिल्यास, उत्पादन क्षेत्रांतील धोरणांमुळे परदेशी गुंतवणूकीवर देखील याचा परिणाम होईल. धोरणे जागतिक अर्थव्यवस्थेसी सुसंगत आणि स्थिर असतील तर भारत जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह देश बनण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्यास याचा जागतिक वित्तीय बाजारपेठांवरही परिणाम होऊ शकतो. याचा सर्वाधिक फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला होईल.
Budget 2026 : जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या Budget ची ही आहे किमया; वाचा खास वैशिष्ट्ये






