फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार ग्रहांची होणारी हालचाल विशिष्ट वेळी बदलत राहते आणि विविध योग तयार करतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावप विविध प्रकारे होत असतो. सप्टेंबरमध्ये एक विशेष चतुर्ग्रही योग तयार होत आहे. सिंह राशीमध्ये बुध, शुक्र, केतू आणि सूर्याच्या संगमामुळे हा योग तयार होत आहे. हा योग काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. तर या काळात काही राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. तसेच तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता. चतुर्ग्रही योगाचा फायदा कोणत्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या
सिंह राशीच्या कुंडलीमध्ये पहिल्या घरातच चतुग्रही योग तयार होत आहे. हा योग सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तुमच्या योजना यशस्वी होतील. रवि आणि शुक्र तुमच्या करिअरमध्येही फायदेशीर ठरतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. या काळात व्यावसायिकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील.
चतुग्रही योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुमची कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्जनशीलतेचे आणि नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल, ज्यामुळे नवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळू शकतात. वडिलांशी तुमचे नाते अधिक मजबूत होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी हा काळ अनुकूल असेल.
धनु राशीच्या लोकांसाठी हा योग खूप भाग्यशाली राहणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. जे लोक भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करु शकतात. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल आणि नवीन लोकांची ओळख होईल. या काळात तुम्ही घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)