फोटो सौजन्य- istock
गुरुवार, 22 मे. अंकशास्त्रानुसार आजचा स्वामी राहू ग्रह आहे. आज गुरुवार असल्याने त्याचा अधिपती ग्रह गुरु आहे. अंकशास्त्रानुसार, आज मूलांक 3 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या विरोधकांपासून दूर राहावे लागेल. त्याचवेळी मूलांक 4 असलेल्या लोकांनी आज व्यवसायासंबंधी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्जनशील विचारसरणीचा लोकांना फायदा होईल आणि समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. मूलांक 1 असणाऱ्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
मूलांक 2 असलेल्या लोकाना स्वतःबद्दल विचार करावा लागेल. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. या मूलांकांच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित असणार आहे. आज तुमचे स्पर्धक तुम्हाला कामाच्या ठिकाणी त्रास देऊ शकतात.तब्येतीची काळजी घ्या.
मूलांक 4 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस तणावपूर्वक असेल. कोणतेही काम करताना काळजी घ्यावी. व्यवसायाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
मूलांक 5 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. काहींना मानसिक ताण जाणवू शकतो. आरोग्याच्या उद्भवू शकतात.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे लागेल, अन्यथा ते आज तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकतात.
मूलांक 7 असलेल्या लोकांना आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. गाडी चालवताना काळजी घ्या दुखापत होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या मुद्यांवरुन मतभेद होऊ शकतात.
मूलांक 8 असलेल्या लोकांना आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. शरीरात ऊर्जा आणण्यासाठी दूध किंवा पाण्यात मध मिसळून पिणे फायदेशीर ठरेल. यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील. आज घरी असतानाही तुम्हाला थोडे थकवा आणि सुस्ती जाणवू शकते. यामुळे तुमचे कुटुंब थोडे अस्वस्थ होऊ शकते.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा दिवस सामान्य राहील. तुम्ही बऱ्याच काळापासून काही शुभ काम करण्याची योजना आखत असाल तर ते पुढे नेण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. आज मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवून कोणतेही काम करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)