फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Bangladesh vs Pakistan ODI Series : पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाची फारच निराशाजनक कामगिरी राहिली. पाकिस्तानचा संघ 2026 च्या टी20 विश्वचषक सुपर 8 मध्ये पर्यत पोहोचला पण संघ नाॅकआऊट सामन्यामध्ये पोहोचण्यात अपयशी झाला. सुपर ८ मध्ये पाकिस्तानच्या संघाने फक्त 1 सामना जिंकला होता. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात मानहानीकारक कामगिरी केल्यानंतर, पाकिस्तान आता बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे.
या मालिकेतही संघाची सुरुवात खराब झाली आहे. आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बांगलादेशने पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले. शेवटचे असे २०१८ च्या आशिया कपमध्ये घडले होते. पाकिस्तानने या मालिकेत तरुण खेळाडू आणि नवीन कर्णधारासह प्रवेश केला आहे. त्यामुळे, संघाला उभे राहून पुनरागमन करणे सोपे जाणार नाही. या अपमानजनक पराभवाबद्दल संघाचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी काय म्हणाला ते जाणून घेऊया.
पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने आठ विकेटनी झालेल्या पराभवाचे वर्णन संघासाठी एक आठवण म्हणून केले. आफ्रिदी सांगितले की, “माझ्या मते आम्ही चांगली सुरुवात केली होती, पण नाहिद राणाने शानदार गोलंदाजी केली. अजूनही दोन सामने शिल्लक आहेत आणि एक संघ म्हणून आम्ही तयार आहोत. जेव्हा तुम्ही सामना हरता तेव्हा तुमचे बरेच गुण जातात असे मला वाटते, परंतु मला वाटते की हा एक तरुण संघ आहे आणि मी शेवटपर्यंत त्याचे समर्थन करेन. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जिंकण्यासाठी भागीदारी आवश्यक असते याची ही एक छोटीशी आठवण आहे.”
Bangladesh won by 8 wickets | Bangladesh 🆚 Pakistan | 1st ODI | Dutch-Bangla Bank ODI Series 2026! 🏏🔥 11 March 2026 | 2:15 PM (BST) SBNCS, Dhaka#BCB #Cricket #Bangladesh #Pakistan #ODI pic.twitter.com/QfJfNIQ3kx — Bangladesh Cricket (@BCBtigers) March 11, 2026
मिरपूर येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानला ८ विकेटने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी संघावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघ ११४ धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून नाहिद राणाने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट घेतल्या. त्यानंतर बांगलादेशला लक्ष्य गाठण्यात कोणतीही अडचण आली नाही आणि त्यांनी १५.१ षटकांत फक्त २ विकेट गमावून ते पूर्ण केले.






