फोटो सौजन्य- istock
हाताच्या अंगठ्याच्या अगदी खाली असलेल्या तळहाताच्या वरच्या भागाला शुक्र पर्वत म्हणतात. ज्योतिषशास्त्रात याचा संबंध प्रेम, शारीरिक आकर्षण, लैंगिक संबंध आणि सौंदर्याशी आहे. असे म्हणतात की, ज्या लोकांच्या हातात शुक्र पर्वत वरती आलेला किंवा उभारलेला असतो, ते दिसायला खूप आकर्षक असतात आणि त्याच बरोबर त्यांना प्रेमाची आसक्ती देखील असते.
हस्तरेखाशास्त्रानुसार बुध, शुक्र, गुरू आणि शनि यासह काही पर्वत व्यक्तीच्या तळहातावर असतात. जे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती यासह जीवनातील अनेक पैलूंबद्दल शुभ आणि अशुभ संकेत देते. तळहातावर असलेल्या शुक्र पर्वताला खूप महत्त्व आहे. तळहातावर मनगटाच्या वर आणि अंगठ्याच्या खाली असलेल्या फुगवटाला शुक्र पर्वत म्हणतात. माऊंट व्हीनसचे क्षेत्र हे कला, हस्तकला आणि सौंदर्यात रसाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, जेव्हा शुक्र पर्वतावर शुक्राची उन्नती होते तेव्हा व्यक्तीचे जीवन भौतिक सुखसोयींमध्ये व्यतीत होते. असे लोक खूप भाग्यवान असतात. अशा लोकांमध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वासाची कमतरता नसते. शुक्र पर्वताविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- इंदिरा एकादशी व्रत कथा जाणून घ्या
शुक्र पर्वताची शुभ आणि अशुभ चिन्हे
असे मानले जाते की, ज्या लोकांच्या तळहातावर शुक्राचा पर्वत पूर्णपणे विकसित आणि उंचावलेला असतो. असे लोक खूप आकर्षक असतात आणि चैनीचे जीवन जगतात. त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण प्रेम आणि पाठिंबा मिळतो. वैवाहिक जीवन आनंदी राहते.
शुक्र पर्वतावर त्रिकोण, चौकोन किंवा क्रॉसचे चिन्हदेखील खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की, अशा लोकांकडे पैशाची कमतरता नसते.
हेदेखील वाचा- सर्वपित्री अमावस्येला पितरांच्या नावाने झाडे लावल्याने होतील फायदे
असे मानले जाते की, ज्या लोकांवर शुक्र पर्वत तारेचे चिन्ह असते. असे लोक प्रेम संबंधांमध्ये यशस्वी होतात. भागीदार त्यांच्यावर खूप प्रेम करतात.
त्याचवेळी, शुक्र पर्वतावरील बेटाचे चिन्ह चांगले चिन्ह मानले जात नाही. हे वैवाहिक जीवनातील समस्यांचे लक्षण असू शकते.
शुक्र पर्वतावरील रेषांचेही अनेक अर्थ आहेत. जर या ठिकाणी अनेक रेषा असतील तर असे मानले जाते की अशा लोकांना त्यांच्या जीवनात विविध चिंतांनी घेरले आहे. रेषांचे जाळे असणे यावरून असे सूचित होते की तुम्हाला अनेक रोग असू शकतात आणि तुमचे मन अनेक समस्यांनी वेढलेले असू शकते.






