भूतकाळातील प्रेमसंबंधाबद्दल आपल्या लाईफ पार्टनरला सांगितले पाहिजे की नाही? प्रेमानंद जी महाराज यांचे विचार काय? सविस्तर माहिती (फोटो सौजन्य - आयस्टॉक)
आज काल जेम- तेम सगळ्यांचे प्रेम संबंध असतात. परंतु काही करणास्तव त्या नात्याचा रुपरंतर लग्ना मध्ये होत नाही. म्हणजे प्रेम आपण एका व्यक्तीवर करतो आणि लग्न दुसऱ्या सोबत होतो. असच काहीस आपल्याला बघायला आणि ऐकायला देखील मिळत. लग्न म्हंटल तर एक दुसऱ्या सोबत आयुष्य काढणे, आयुष्यभर साथ देण्याचा वाचन देणे, एकमेकांवर अपरंपार प्रेम करणे. लग्नगाठ फक्त प्रेमाचा आणि विश्वासाचा बंधन नाही तर एक दुसऱ्यांमध्ये भावनात्मक आणि मानसिक बंधन निर्माण होतो. मात्र जर आपला लग्न आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या सोबत न होता दुसऱ्या व्यक्ती सोबत झालं तर? हा प्रश्नच आहे. परंतु काही लोक लग्न झाल्यानंतर आपल्या प्रेमाला विसरून जाण्याचा प्रयत्न करतात आणि ज्याच्या सोबत लग्न झालं आहे त्याच्यावर प्रेम करायला सुरवात करतात आणि आपलं आयुष्य सुखात काढतात. त्या मागचे कारण काहीही असू शकते. मात्र लग्नानंतर जीवनसाथीला जुन्या प्रेमसंबंधाबद्दल बोललं पाहिजे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. यावर प्रेमानंद जी महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले आहे. बघुयात…
रंगपंचमीच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय, धनधान्याने भरुन जाईल तुमची झोळी
आजकाल खूप लोक आपल्या जोडीदाराशी प्रामाणिकपणे आपल्या भूतकाळातील प्रेमसंबंधाबद्दल बोलतात. कोणत्या पण गोष्टी लपवल्याने गडबड होऊ शकते अशी सगळ्यांची एक नॉर्मल मेंटलिटी झाली आहे. मात्र प्रेमानंद जी महाराजच्या अनुसार, प्रत्येक गोष्टी सांगणं आवश्यक नाही आहे, विशेषतः जर ती गोष्ट आपल्या जुन्या प्रेम प्रसंगाबद्दल असेल तर.
काय सांगतात प्रेमानंद जी महाराज?
प्रेमानंद जी महाराज सांगतात की लग्नानंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या जोडीदाराविषयी पूर्ण निष्ठा ठेवली पाहिजे. जर कोणत्या व्यक्तीने लग्ना आधी कोणत्या व्यक्ती सोबत प्रेम संबंध ठेवला असेल, तर त्या व्यक्तीने आपला भूतकाळ विसरले पाहिजे आणि आपल्या वर्तमान जोडीसाराशी आनंदी जीवन काढला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की, जुन्या प्रेमाबाबत बोलणे हे नात्यात नकारात्मकता आणू शकते. या कारणाने लग्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
भूतकाळातील नात्याबद्दल मोकळेपणाने बोल्याने आपल्या जोडीदाराला असुरक्षितता आणि शंका निर्माण होऊ शकते. याचा परिणाम वर्तमान नात्यावर होऊ शकतो. लग्न एक नवीन सुरवात आहे आणि भूतकाळातील ओझ्यापासून मुक्त ठेवले पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती लग्न करतो तेव्हा तो आपल्या जोडीदाराचा सर्वात महत्वाचा आणि प्रिय व्यक्ती असतो.
जर एकाद्या व्यक्तीने पहिले चुकीच्या नात्यात आपला वेळ घालवला असेल आणि आता तो व्यक्ती एक पवित्र लग्न बंधनात जगायचं प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला समजावं लागेल की त्याचा तो भूतकाळ होता आणि आता त्याने आपल्या वर्तमान नात्यावर पूर्ण लक्ष द्यावं असं प्रेमानंद महाराज म्हणतात. प्रेमानंद जी महाराजच्या नुसार, भूतकाळाला मागे सोडून वर्तमान मध्ये खुश राहणं हाच एक योग्य मार्ग आहे. आयुष्यात केलेल्या चुकांना स्वीकारत आपल्या भविष्याकडे वाटचाल केलं पाहिजे.
Chanakya Niti: करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी या गोष्टींचे करा पालन