फोटो सौजन्य- pinterest
भारतीय परंपरेनुसार पितृपक्ष हा पूर्वजांच्या स्मृतीसाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा काळ तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान यासारख्या धार्मिक विधींना समर्पित आहे. मात्र यंदाचे पितृपक्ष खूप खास मानले जाते. कारण यावेळी पितृपक्षाचा संबंध एका दुर्मिळ योगायोगाशी संबंधित आहे.
पितृपक्षाची सुरुवात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसांपासून होते. ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही वेळी ग्रहण होण्याची शक्यता आहे. यावेळी 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण तर 21 सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असा योग 100 वर्षानंतर पाहायला मिळणार आहे. असे मानले जाते की, या योगाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. खासकरुन मिथुन, धनु आणि मकर राशीसाठी हा काळ खूप शुभ मानला जातो.
भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाची सुरुवात होते आणि ही तिथी अमावस्येपर्यंत चालते. ही तिथी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, श्राद्ध आणि दान करण्यासाठी खूप पवित्र मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही ग्रह एकत्र येणे हा दुर्मिळ योग मानला जातो. या योगाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होताना दिसून येतो.
पितृपक्षातील ग्रहण युती मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहील. या काळात तुमची आर्थिक स्थिती बदलू शकते. तसेच तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. घर, मालमत्ता किंवा रिअल इस्टेटशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
पितृपक्षाचा हा काळ धनु राशीच्या लोकांसाची नवे वळण घेऊन येणारा असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढू शकतो. व्यावसायिक जीवन सुधारेल. कोणत्याही गुंतवणुकीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले प्रकल्प या काळात पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
पितृपक्षामध्ये मकर राशीचे लोक या काळामध्ये अपेक्षित यश संपादन करु शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे अपेक्षित यश मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)