फोटो सौजन्य- pinterest
काही लोकांचा नशिबावर विश्वास असतो तर काहींना कृतींवर विश्वास ठेवतात. मात्र भाग्यवादी लोकांचा असा विश्वास आहे की तुमच्या नशिबात जे काही आहे ते तुम्हाला मिळेल, तुम्ही काहीही केले तरी. तर कर्मवादी लोकांचा असा विश्वास आहे की, कर्माच्या जोरावर त्यांची स्वप्ने ते पूर्ण करु शकतात त्यामुळे अशा लोकांचा नशिबावर विश्वास नसतो. मात्र या दोन्ही लोकांच्या तळहातावरील रेषेवरुन त्यांचे नशीब काय आहे ते समजते. भाग्यरेषा एखाद्या व्यक्तीचे जीवन कसे असेल ते सांगते. तळहातावरील रेषा पाहून व्यक्तीला भविष्यात अपेक्षित यश मिळणार आहे की नाही ते सांगता येते. कोणती आहे ती रेषा जाणून घ्या
हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहाताच्या खालच्या टोकापासून ज्या ठिकाणपासून मणिबंध रेषा सुरू होते, तिथून जीवनरेषेसह एक रेषा सूर्य किंवा शनि पर्वताकडे वर सरकते. तिला भाग्यरेषा असे म्हटले जाते. कधीकधी भाग्यरेषा जीवनरेषेतून बाहेर पडते त्यावेळी ती मेंदूच्या रेषेतून देखील बाहेर पडताना दिसते. कधीकधी ही रेषा तळहाताच्या मध्यभागी असते. मात्र ही रेषा एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर स्पष्ट असेल आणि ती सरळ वरच्या दिशेने सरकत असल्यास ती खूप खास मानली जाते.
तुमच्या हाताची भाग्यरेषा सूर्य पर्वतापर्यंत पोहोचली असेल, म्हणजेच अनामिका बोटाजवळ पोहोचली असेल अशा लोकांना समाजात आदर आणि उच्च स्थान मिळते. तसेच असे लोक नेहमी सरकार, राजकारण किंवा सरकारी नोकरीत कार्यरत असू शकतात. सूर्याच्या शुभतेमुळे त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होते. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे यामुळे भाग्यरेषेचे लोक राजाप्रमाणे सुखसोयींचा आनंद घेतात.
परंतु एखाद्या वेळेस भाग्य रेषा वरच्या बाजूला जाऊन दोन भागांमध्ये विभागली गेल्यास त्या व्यक्तीला जीवनामध्ये कधीतरी करिअरमध्ये बदल होताना दिसू शकतो. तसेच या लोकांना व्यावहारिक ज्ञानाचा देखील खूप फायदा होतो.
तळहाताच्या मध्यभागी असलेला भाग राहूचा मानला जातो. तुमच्या राहू क्षेत्रात दोन भाग्यरेषा असल्यास किंवा राहु क्षेत्रात भाग्यरेषा संपते. जर राहू रेषा दोन भागामध्ये विभागली गेली असल्यास असे लोक अचानक श्रीमंत होऊ शकतात. या लोकांना व्यवसायामध्ये नफा होतो. तसेच करिअरमध्ये बदल होताना दिसून येऊ शकतात तर सुरू झालेले काम तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ देऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)