फोटो सौजन्य- istock
गौरी पूजन हा हिंदू महिलांचा एक महत्त्वाचा सण आहे. जो गौरी देवीच्या पूजेसाठी समर्पित आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी हा सण येतो. याला ज्येष्ठ गौरी आवाहन असे म्हटले जाते. गौरी गणपतीचा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी माहेरवाशीणी घरामध्ये गौरींना घेऊन येतात. ज्या मुलींचे नवीन लग्न झाले असते त्या ओसा भरतात तशी परंपरा असते. हा सण तीन दिवस साजरा केला जातो. म्हणजेच पहिल्या दिवशी गौरीचे आगमन होते दुसऱ्या दिवशी गौरीची पूजा करुन महिला ओसा भरतात. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी गणपतीचे विसर्जन केले जाते. गौरी आवाहन, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि विसर्जन कधी आहे, जाणून घ्या
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गौरी आवाहन केले जाते. यंदा गौरी आवाहन रविवार, 31 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी महिला गौरी देवीची मूर्ती घरी आणतात. देवीची मूर्ती घरी आणण्यपूर्वी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात त्यानंतर देवीची मूर्ती घरामध्ये आणली जाते.
ज्येष्ठा गौरी आवाहन रविवार, 31 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी गौरीचे आगमन संध्याकाळी 5:25 वाजेपर्यंत करण्यात येऊ शकते. सोमवार, 1 सप्टेंबर रोजी गौरी पूजन करण्यासाठी मुहूर्त सकाळी 5.59 ते संध्याकाळी 6.43 वाजेपर्यंत आहे. पूजेसाठी एकूण कालावधी 12 तास 43 मिनिटे आहे. त्यानंतर मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. या दिवशी विसर्जन करण्यासाठी मुहूर्त सकाळी 6 ते संध्याकाळी 6.41 पर्यंत आहे. या कालावधीमध्ये सोमवार, 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.55 वाजता ज्येष्ठ नक्षत्र संपणार आहे.
गौरी देवीला शक्ती, सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गौरीची पूजा केल्याने कुटुंबामध्ये अखंड सौभाग्य, वैवाहिक आनंद, संपत्ती आणि समृद्धी येते, असे म्हटले जाते.
पौराणिक कथेनुसार, जेव्हा स्त्रिया राक्षसांच्या अत्याचारांनी त्रस्त होत्या, त्यावेळी त्यांनी देवी गौरीचा आश्रय घेतला. देवीने त्यांचे रक्षण केले आणि वाईट शक्तींचा नाश केला. तेव्हापासून, हा सण विशेषतः सुरक्षितता, आनंद आणि वैवाहिक समृद्धीसाठी साजरा केला जातो.
गौरी आवाहानावेळी स्वच्छता पाळावी. गौरी आवाहनाचा मुहूर्त चुकवू नये. नित्यनेमाने पूजा करावी, पूजा करताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. मांसाहार करणे टाळावे आणि पावित्र्याची विशेष काळजी घ्यावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)