उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमधील साईनाथ कॉलनी परिसरात सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवर त्यांच्याच मेहूण्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात योगेश मिश्रा आणि त्याचा धीरज मोठाले हे दोघे जखमी झाले आहेत.
Nikki Death Case : निक्की हत्याकांडप्रकरणी मोठा खुलासा, सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती उघड
नेमकं प्रकरण काय?
२७ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साईनाथ कॉलनीतील रहिवासी असलेले आणि आरोपीचा भावोजी योगेश मिश्रा आणि त्यांचा मित्र धीरज मिठाले हे सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्याचवेळी मोनू शेख (मेहूणा) आणि त्याच्या साथीदारांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात योगेशच्या छातीत गोळी लागली. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी धारदार शास्त्रे आणि तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
का करण्यात आला हल्ला ?
हल्लेनंतर आरोपी मोनू शेख आणि त्याचे साथीदार फरार झाले. जखमी योगेश आणि धीरज यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे जुना वाद असल्याचेही शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू आणि जखमी योगेश हे एकेकाळी एकत्र काम करत होते. मात्र नंतर त्यांच्यात वाद झाला. योगेशने मनूच्या बहिणीसोबत लग्न केल्याचा रागही त्याच्या मनात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे. गोळीबार करणाऱ्या मोनू शेख आणि त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी आणि जखमी यांच्यावर याआधीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मनूच्या अटकेनंतरच या हल्ल्यामागचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
शोरूममध्ये घुसून कामगारानेच केली चोरी; सुरक्षा रक्षकाचे हात- पाय बांधले अन्…
वाकडेवाडीतील नामांकित दुचाकीच्या शोरुममधील सुरक्षा रक्षकाला कटरचा धाक दाखवून व त्याचे हातपाय बांधुन शोरुममधील ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटणारा चोरटा शोरूममधीलच कामगार निघाला आहे. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. प्रतिक भारत सावंत (वय २३, रा. सुळे पीजी महर्षीनगर, गुलटेकडी) असे चोरट्याचे नाव आहे.
प्रतिक हा याच शोरुममध्ये स्टोअर किपर म्हणून काम करतो. त्यानेच सुरक्षा रक्षकाला धाक दाखवून पैसे चोरुन नेले होते. दरम्यान, आपला हा रोकड चोरीचा प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून दोन दिवस तो कामावर आला होता. त्यानंतर त्याने चार दिवस सुट्टी घेतली होती. याबाबत शोरुमच्या जनरल मॅनेजर यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदुम व त्यांच्या पथकाने केली.
Nikki Death Case : निक्की हत्याकांडप्रकरणी मोठा खुलासा, सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती उघड