फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वनस्पती आणि रोप लावण्याला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, प्रत्येक वनस्पती घरामध्ये स्वतःची ऊर्जा आणि प्रभाव प्रभावित करते. अशा वेळी एक रोप घरात लावणे शुभ मानले जाते ते म्हणजे पेरु. पेरुला धार्मिक आणि आयुर्वेदात देखील महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात पेरूचे झाड लावणे हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ते लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
मान्यतेनुसार, पेरूचे झाड आग्नेय दिशेला किंवा पूर्व दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबामध्ये शांती मुलांचे आनंद आणि आर्थिक प्रगती टिकून राहते. शास्त्रांमध्ये म्हटल्यानुसार, घरात पेरूचे झाड लावल्याने घरामध्ये देवी देवतांचा वास राहतो. त्यासोबतच कुटुंबावर देवी-देवतांचा आशीर्वाद राहतो.
हिंदू धर्मामध्ये पेरुच्या झाडाला खूप पवित्र मानले जाते. या पानांचा वापर धार्मिक समारंभ, हवन आणि पूजा यामध्ये केला जातो. पेरूचे फळ पवित्रता आणि सात्त्विकतेचे प्रतीक मानले जाते. रूचे फळ आणि पाने गणपती बाप्पाला अर्पण केली जातात. असे म्हटले जाते की, गणपती बाप्पाला पेरु अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि बुद्धी आणि विवेक देखील मिळते. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी देखील मान्यता आहे. गणेश चतुर्थीपासून विसर्जनापर्यंत पेरु अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.
घरामध्ये बरेच जण तुळशीचे रोप लावतात या रोपासोबतच पेरुचे रोप लावणे शुभ मानले जाते. कारण त्याला समृद्धीचे प्रतीक म्हणून मानले जाते.
धार्मिक फायद्यांव्यतिरिक्त पेरुचे आयुर्वेदिक फायदे देखील आहेत. आयुर्वेदात पेरूला सुपरफ्रूटच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. यामुळे पचनशक्ती मजबूत होते. त्यासोबतच बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण करते. त्याचसोबत ज्या लोकांना दात आणि हिरड्यांच्या समस्या आहेत त्या लोकांनी पेरुच्या पानाचा काढा पिणे खूप फायदेशीर मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील पेरूचे सेवन उपयुक्त मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)