फोटो सौजन्य- pinterest
रक्षाबंधनाचा पवित्र सण यावेळी शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणार आहे. हा सण भाऊ आणि बहिणीमधील प्रेम आणि संरक्षणाच्या बंधनाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि त्यांना मिठाई भेट देतात.
या दिवशी तुम्ही भावाला त्याच्या राशीनुसार मिठाई भेट दिल्यास तुमच्या भावाला त्याचे खूप फायदे होतील. तसेच त्याची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीच्या आवडी आणि ग्रहांचा प्रभाव वेगवेगळा असतो. रक्षाबंधनाला भावाला त्याच्या राशीनुसार कोणती मिठाई द्यावी, जाणून घ्या
शनिवार, 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 5.21 ते दुपारी 1.24 पर्यंत आहे. याशिवाय राखी बांधण्यासाठी ब्रम्ह मुहूर्त सकाळी 4.22 ते 5.4 वाजेपर्यंत राहील. तर अभिजित मुहूर्त दुपारी 12 ते 12.43 पर्यंत राहील. संध्याकाळचा मुहूर्त 7.6 ते 7.27 पर्यंत राहील.
मेष राशीच्या लोकांना बेसन किंवा मोतीचूरचा लाडू भेट म्हणून देऊ शकता.
वृषभ राशीच्या लोकांना रसगुल्ला भेट देऊ शकता. यामुळे तुमच्या जीवनामध्ये शुक्र बलवान होऊ शकतो.
मिथुन राशीच्या लोकांना बदाम आणि केशर मिश्रित खीर देऊ शकता.
कर्क राशीच्या लोकांना सर्वांत गोड पदार्थ असलेला मालपुआ भेट म्हणून देऊ शकता.
सिंह राशीच्या लोकांना कोणत्याही प्रकारची मिठाई भेट देऊ शकता.
कन्या राशीच्या लोकांना दुधापासून बनवलेली मिठाई भेट देऊ शकता. कारण याचा संबंध बुध ग्रहांशी असतो.
तूळ राशीच्या लोकांना रबरीसारखी मिठाई भेट द्या.
वृश्चिक राशीच्या लोकांना काजू कतली भेट द्या. यामुळे मंगळ ग्रह संतुलित राहतो.
धनु राशीच्या लोकांनी दूधपासून बनलेली मिठाई किंवा नारळाची बर्फी देणे शुभ मानले जाते. कारण या गोष्टी गुरूला बळ देते.
मकर राशीच्या लोकांना तिळाचे लाडू द्या. त्यामुळे तुमच्या कुंडलीमधील शनि बलवान होतो.
कुंभ राशीच्या लोकांनी जिलेबी भेट द्या. तसेच उडीद डाळीच्या पिठापासून बनवला जाणार पदार्थ आणि साखरेच्या पाकात बुडवून तायर केला जाणारा पदार्थ इमरती जे जिलेबीच्या आकारासारखे असते. याला जांगिरी किंवा अमृती देखील म्हटले जाते.
मीन राशीच्या लोकांना रसमलाई भेट द्यावी आणि शक्यतो ती पिवळ्या रंगाची असावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)