फोटो सौजन्य- pinterest
रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्री रामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला, कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो. रामनवमी फक्त भारताच नाही तर जगभरात साजरी केली जाते. पंचांगानुसार, यावर्षी गुरुवार, २६ मार्च रोजी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांची जयंती, म्हणजेच रामनवमी, मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाईल, भगवान रामांचा जन्म त्रेता युगात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी झाला होता. हा सण केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ज्योतिषशास्त्रानुसारही विशेष आहे, कारण या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ काळात भगवंताची उपासना केल्याने केवळ मनःशांतीच नव्हे, तर जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तीही मिळते.
पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीची यावर्षी २६ मार्च रोजी सकाळी ११:४८ वाजता होणार आहे आणि २७ मार्च रोजी सकाळी १०:०६ पर्यंत ही तिथी असणार आहे. प्रभू रामाची उपासना करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ सकाळी ११:१३ ते दुपारी १:४१ पर्यंत आहे. दुपारचे १२:२७ हे तास विशेषतः शुभ मानले जातात, कारण यावेळी प्रभू प्रकट होतात, अशी श्रद्धा आहे.
ज्योतिषांच्या मते, या रामनवमीला चार अद्वितीय योग तयार होत आहेत, जे साधकांसाठी अत्यंत फलदायी आहेत.
शोभन योग: हा योग रात्रभर टिकेल आणि या योगात केलेली पूजा इच्छा पूर्ण करते.
सर्वार्थ सिद्धी योग: सायंकाळी ४:१९ वाजता सुरू होणारा हा योग कार्यात यश सुनिश्चित करतो.
रवी योग: सायंकाळी ४:१९ नंतरची वेळ उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम आहे.
जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते.
पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या.
त्यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा. त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजालाने शुद्ध करून चौरगांवर स्थापित कराव्यात.
मग चंदनाचा टिळा लावावा, त्यानंतर अक्षता, फूल अशी पूजेची सामग्री अपर्ण करावी.
मग तुपाचा दिवास लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालिसा आणि रामायणातील शलोकांचे पठण करावे.
तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदर कांडमधील पाठ पठणही करू शकता.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: कधी कधी रामनवमीच्या दिवशी विशेष ग्रहयोग, तिथी आणि नक्षत्र एकत्र येतात, ज्यामुळे हा दिवस अधिक शुभ आणि फलदायी मानला जातो.
Ans: हा दिवस धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक असलेल्या भगवान श्रीराम यांच्या जन्माचा उत्सव आहे.
Ans: रामरक्षा स्तोत्र पठण, रामायण वाचन दान आणि सेवा हे उपाय केल्यास सकारात्मक फल मिळते.






