शनि आणि राहुच्या युतीमुळे होणार तीन राशींना त्रास
शनिदेव आपल्या कर्माचे फळ देणारे आहेत. तो न्यायाधीश असून कोणावरही अन्याय करत नाही. एखादी व्यक्ती कोणतीही कृती करते, त्याला क्रूर स्वभावाचे प्रतिफळ देण्याचे काम शनी करतो. शनि एका राशीमध्ये सुमारे अडीच वर्षे राहतो आणि सर्व 12 राशींचे चक्र पूर्ण करण्यासाठी त्याला सुमारे 30 वर्षे लागतात. पुढील वर्षी शनिचा मीन राशीत प्रवेश होणार आहे, जिथे राहु आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत या दोन्हींच्या संयोगामुळे अत्यंत विनाशकारी पिशाच योग तयार होत आहे. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होणार आहेत.
ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, पुढील वर्षी 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10.07 वाजता शनि हा मीनमध्ये संक्रमण करणार असून यासहव महापिशाच योग देखील सुरू होईल. हा योग राहूच्या राशिचक्र चिन्ह बदलल्यानंतरच संपेल. तोपर्यंत 3 राशींना त्रास सहन करावा लागणार आहे. या कोणत्या राशी आहेत हे आपण ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांच्याकडून समजून घेऊ (फोटो सौजन्य – iStock)
कन्या रास
कन्या राशीला होणारा त्रास
या राशीच्या लोकांनी पुढील वर्षी मार्चनंतर काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. घरात वाद सुरू होऊ शकतात. भागीदारीत केलेल्या व्यवसायात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. धीर धरा आणि अनावश्यक खर्च करू नका. कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा. हळूहळू ही वाईट वेळही निघून जाईल आणि चांगली परिस्थिती उद्भवेल. तोपर्यंत संयम बाळगा
लक्ष्मी मातेची पूजा करताना ‘या’ नावांचा जप करा, जाणून घ्या
मकर रास
शनि-राहूचा मकर राशीवर प्रभाव
महापिशाच योग तयार झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा आणि घरचे ताजे अन्न खाण्यास सुरुवात करा. भावंडांशी किंवा शेजाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. प्रवासात सतर्क राहा, अपघात होण्याची शक्यता आहे. पैसा जपून खर्च करा. तुम्ही कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका. तसंच तुम्हाला त्रास होणार आहे हे आधीच माहीत असल्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाका
मीन रास
मीन राशीवर काय होणार परिणाम
शनि आणि राहूच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात अशांतता येऊ शकते. तुम्हाला थकवा जाणवेल आणि मानसिक तणावही तुम्हाला घेरेल. व्यवसायात तुमचे नुकसान होऊ शकते. सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. तुमच्यावर कर्ज होऊ शकते. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी आधीच थोडी व्यवस्था करून ठेवा. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं हे समजून घ्या. वेळीच सावध व्हा आणि येणाऱ्या पुढच्या संकटांची चाहूल आधीच ओळखा
काय आहे रुद्राक्षाचे रहस्य? हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे सुधारते ते जाणून घ्या
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.