फोटो सौजन्य- pinterest
नवरात्रीचा तिसरा दिवस खूप खास असणार आहे. कारण यावेळी तृतीया तिथी दोन दिवस असणार आहे म्हणजे 24 ते 25 स्पटेंबर असणार आहे. या दिवशी चंद्रघंटा देवीच्या रुपाची पूजा केली जाणार आहे. देवीच्या या रूपाचे वर्णन अत्यंत सौम्य आणि शांत, सुख आणि समृद्धी देणारे असे केले आहे. चंद्रघंटा देवीची योग्य पद्धतीने पूजा केल्याने समाजात व्यक्तीचे सुख आणि आदर वाढतो. या दिवशी देवीच्या या साध्या, सौम्य आणि शांत स्वरूपाची पूजा केल्याने आत्मविश्वास आणि भौतिक सुखसोयी वाढतात. चंद्रघंटा देवीची पूजा करण्याची पद्धत, मंत्र आणि कोणता नैवेद्य दाखवायचा ते जाणून घ्या
शारदीय नवरात्रीच्या दिवशी देवीच्या तिसरे रुप चंद्रघंटा आहे. तिच्या कपाळावर घंटा आकाराचा चंद्रकोर आहे म्हणून तिला चंद्रघंटा नाव पडले असे म्हटले जाते. हे नाव एक अद्वितीय तेज आणि करुणा दर्शवते. देवी चंद्रघंटा यांचे रूप भव्य आणि अलौकिक आहे, शांती पसरवते. तिची शक्ती देखील अतुलनीय आहे. देवी चंद्रघंटा प्रत्येक क्षेत्रात यश आणि समृद्धी प्रदान करते. या दिवशी देवीची पूजा केल्याने जीवनात यश मिळते. तृतीया महिन्याच्या तिसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी देवीची पूजा करावी त्यामुळे देवीचे आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. देवीची पूजा करताना तिला लाल आणि पिवळ्या झेंडूची फुले अर्पण करणे महत्त्वाचे आहे. ही फुले देवीची करुणा आणि शक्तीचे प्रतीक मानली जातात.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहू्र्तावर उठून आवरुन झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर, देवीची मूर्ती लाल किंवा पिवळ्या कपडावर ठेवून त्यावर कुंकू, तांदूळ, फुले आणि माळ अर्पण करावी. चंद्रघंटा देवीच्या पूजेमध्ये पिवळ्या फुलांचा आणि कपड्यांचा विशेष वापर करावा. यावेळी देवीला पिवळ्या रंगांची मिठाई आणि दुधाची खीर अर्पण करावी. त्यानंतर पूजा झाल्यानंतर देवीच्या मंत्रांचा जप करावा. विहित विधीनुसार देवीची चंद्रघंटा आरती करावी.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाला खीर अर्पण करणे सर्वोत्तम मानले जाते. म्हणून देवीला केशरयुक्त खीर अवश्य अर्पण करा. तुम्ही लवंग, सुकामेवा, वेलची आणि दुधापासून बनवलेल्या मिठाई देखील अर्पण करू शकता. तुम्ही साखरेचा गोड पदार्थ आणि पेढे देखील देऊ शकता.
पिण्डज प्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता,
प्रसादं तनुते महयं चन्द्रघण्टेति विश्रुता।
वन्दे वांछित लाभाय चन्द्रार्धकृत शेखरम्,
सिंहारूढा चंद्रघंटा यशस्वनीम्।
मणिपुर स्थितां तृतीय दुर्गा त्रिनेत्राम्,
रंग, गदा, त्रिशूल,चापचर,पदम् कमण्डलु माला, वराभीतकराम्।
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)