फोटो सौजन्य: गुगल
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे फक्त एक वाक्य नाही तर संपूर्ण स्वामी भक्तांना आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मिळणारी प्रेरणा आहे. अनंत कोटी ब्रम्हांड नायक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांना दत्तगुरुंचे अवतार म्हटलं जातं. सत्कर्म हीच इश्वर सेवा अशी शिकवण स्वामींनी त्यांच्या कार्यकाळात दिली होती. स्वामींनी कधी कर्मकाडांला दुजोरा दिला नाही. खरतरं इश्वरसेवा म्हणजे कायबाबत स्वामी म्हणाले की, तुम्ही केलेलं चांगलं कर्म, सेवाभावाने गरजूंना केलेली मदत आणि स्वत:वर ठेवलेला अढळ विश्वास म्हणजे खरी इश्वरभक्ती आहे. स्वामींच्या मठाजवळ कुठे ना कुठे औदुंबराचं झाड दिसतं. हिंदू धर्मात विशेष पूजनीय मानलं जातं. विशेषतः दत्तसंप्रदायात या झाडाला फार मोठं स्थान आहे.
अक्कलकोट येथे स्वामी समर्थ ज्या जागी वास्तव्य करत असत, तिथे औदुंबर झाडं होती, आणि अनेक भक्तांनी तिथे त्यांना ध्यानस्थ अवस्थेत पाहिलं असल्याचे वर्णन आहे.काही भक्तगाथांमध्ये असं सांगितलं जातं की,स्वामी औदुंबर वृक्षाच्या छायेत शांतपणे ध्यान करत असत, आणि त्यांचं तेज झाडाभोवती जाणवत असे.औदुंबराच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास आहे. त्यामुळे औदुंबर पूजन केल्याने दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो. यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे. खरंतर कुठलीही प्रार्थना स्थळं ही सकारात्मक ऊर्जा देत असतात.औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्याने मनशांती लाभते. औदुंबराचं झाड हे वटवृक्षांच्या जातकुळीतील आहे, हे झाड असून याची मुळं पाण्याची साठे घट्ट धरुन ठेवतात. निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील औदुंबराचं पुजन केलं जातं. त्यामुळे धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या औदुंबराचं महत्त्व मोठं आहे.
स्वामी कायम म्हणतात आपण जसा विचार करतो तिचं आयुष्यात घडतं. त्यामुळे तुम्ही स्वत:बद्ल काय विचार करता यावर देखील तुमचं भवितव्य अवलंबून असतं. देव तेव्हा तुमची मदत करतो जेव्हा तुम्ही स्वत:ची मदत करण्यासाठी धडपडत असतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी ही वाक्य अनेक बिकट आव्हानातून बाहेर पडण्यासाठी बळ देतात.सेवाभावी वृत्तीने केलेली मदत, सत्कर्म आणि माणसाला माणूस वागवणं हीच खरी इश्वरसेवा असं स्वामी कायम म्हणतात.