फोटो सौजन्य- pinterest
कर्क राशीमध्ये शुक्र आणि बुध यांच्या एकत्रित येण्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग खूप शुभ आणि फायदेशीर मानला जातो. हा योग व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धी, संपत्ती आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. हा राजयोग जन्माष्टमीनंतर तयार होत आहे. 21 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर 11 ऑगस्टपासून बुध ग्रह कर्क राशीत स्थित असेल. या दोन्ही ग्रहांच्या युतीचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे.
या शुभ योगामुळे काही राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ, मान-सन्मानात वाढ आणि भौतिक सुखसोयींचा विस्तार होणार आहे. ज्या लोकांना बराच काळ प्रयत्न करुनही अपेक्षित यश मिळत नाही अशा लोकांना हा काळ चांगला राहील. लक्ष्मी नारायण राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या
21 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह तुमच्या कुंडलीच्या चौथ्या घरात संक्रमण करणार आहे. हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या बऱ्याच काळापासून अपूर्ण असलेल्या इच्छा पूर्ण होतात. घर, वाहन किंवा घराच्या सजावटीशी संबंधित कोणतीही योजना आता प्रत्यक्षात येऊ शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ देखील होऊ शकतात.
कर्क राशीच्या कुंडलीमध्ये हे संक्रमण पहिल्या घरात होत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनशैलीवर त्याचा परिणाम होणार आहे. तुमचे आकर्षण, सौंदर्य आणि प्रभाव त्यामुळे वाढेल. कला, लेखन, संगीत आणि फॅशनशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. वैयक्तिक जीवनात आनंद राहील.
कन्या राशीच्या कुंडलीमध्ये हे संक्रमण अकराव्या घरात होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीतील बोनस असो, गुंतवणुकीतून नफा असो किंवा जुन्या कर्जाची परतफेड होऊ शकते. यावेळी नशीब तुमच्या बाजूने राहील. जवळच्या लोकांकडून पाठिंबा मिळेल. या संक्रमणामुळे तुम्हाला संपत्ती, आदर आणि समाधानाच्या मार्गावर पुढे घेऊन जाईल.
शुक्र ग्रह या राशीमध्ये नवव्या घरामध्ये असल्याने या लोकांचे नशीब तुमच्या बाजूने राहणार आहे. त्याचप्रमाणे या काळामध्ये तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाणी फिरायला जाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि घरी काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करु शकता. सरकारी नोकरीतील लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहांचे हे संक्रमण सातव्या घरात होणार आहे. या काळामध्ये तुम्हाला विवाह आणि भागीदारीच्या बाबतीत सकारात्मक परिणाम मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी ताण येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)