फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व आहे. कारण हा ग्रह संपत्ती, विलास, वैभव, वैवाहिक सुख आणि समृद्धीचा कर्ता आहे. ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असतो. ती व्यक्ती नेहमीच विलासी जीवन जगते, अशी मान्यता आहे. शुक्राचे संक्रमण काही राशीच्या लोकांना फायदेशीर ठरते. यावेळी शुक्र ग्रह लवकरच आपली राशी बदलणार आहे. त्यामुळे या बदलाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना कामांमध्ये आर्थिक फायदा होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह 28 जानेवारीपासून मीन राशीमध्ये आहे. आता शनिवार, 31 मे रोजी शुक्र मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे त्याचा मीन राशीतील प्रवेश तिथे संपणार आहे. शुक्र ग्रहाचे हे संक्रमण 31 मे रोजी सकाळी 11.42 वाजता होणार आहे.
शुक्राच्या संक्रमणाचा मेष राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. शुक्र हा दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. यावेळी मेष राशीमध्ये शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे त्यांचे उत्पन्न आणि आर्थिक लाभाचे स्रोत वाढतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
मेष राशीमध्ये शुक्र ग्रहांच्या संक्रमणाचा मिथुन राशीच्या लोकांना फायदा होईल. या लोकांचे आरोग्य चांगले राहील. तसेच घरी शुभ कार्य आयोजित करु शकतात. संपत्तीत वाढ होईल. तुम्ही दागिन्यांची खरेदी करू शकता. विविध माध्यमातून पैसे मिळतील. लेखन करणाऱ्यांना विशेष संधी उपलब्ध होतील. तुम्ही नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता.
मेष राशीमध्ये शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायामध्ये मोटे सकारात्मक बदल होणार आहेत. पैशाच्या समस्या दूर होतील. या काळात कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. काही खर्च वाढण्याची चिन्हे आहेत, म्हणून पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करा.
धनु राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाचे संक्रमण आनंदाचे वरदान घेऊन येणारे असेल. शुक्र धनु राशीच्या पाचव्या घरात भ्रमण करणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळेल. इच्छित कामात तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्हाला नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधीदेखील मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)