फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात ग्रहण अशुभ मानले जातात. यावर्षी दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण रविवार, 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ग्रहणाच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी ग्रहणानंतर स्नान आणि दान करण्याची प्रथा आहे. ग्रहणाच्या काळात वातावरणामधील नकारात्मकता वाढते. ज्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर आणि मानसिक स्थितीवर वाईट होतो. अश्विन महिन्याच्या अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही परंतु त्याचा वाईट परिणाम काही राशीच्या लोकांवर होऊ शकतो. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी स्नान करुन काही गोष्टींचे दान करावे. त्यामुळे सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळतात आणि पूर्वज देखील प्रसन्न होतात. सूर्यग्रहणाच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या
वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण रविवार, 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे आंशिक ग्रहण असेल. हे ग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10.59 वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल आणि सुमारे पहाटे 3.23 पर्यंत चालेल. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
मेष राशीच्या लोकांनी सूर्यग्रहणाच्या वेळी लाल रंगांचे वस्त्र दान करावे, असे करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने रखडलेली कामे पूर्ण होण्यास लवकर पूर्ण होईल.
सूर्यग्रहणाच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ, साखर आणि दूध दान करावे. असे केल्याने व्यक्तीला मनाला शांती मिळते.
सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्याचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि ग्रहणाचे परिणाम दूर करण्यासाठी मूगाचे दान करावे, असे करणे शुभ मानले जाते.
सूर्यग्रहणाच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी पांढऱ्या कपड्यांचे दान करावे, असे करणे शुभ मानले जाते. तसेच व्यक्तीला फायदा देखील होतो.
सूर्यग्रहणाच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी गरिबांना गूळ, शेंगदाणे आणि मसूर याचे दान करावे. असे केल्याने तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो.
कन्या राशीच्या लोकांनी सूर्यग्रहणाच्या दिवशी हंगामी फळे आणि भाज्या यांचे दान करावे. असे केल्याने तुम्हाला चांगले फळ मिळतात.
तूळ राशीच्या लोकांनी सूर्यग्रहणाच्या दिवशी खीर तयार करून गरिबांमध्ये वाटणे शुभ राहील.
सूर्यग्रहणाच्या दिवशी अशुभ परिणाम टाळण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी गरिबांना अन्न दान करणे चांगले राहील.
धनु राशीच्या लोकांनी सूर्यग्रहणाच्या दिवशी कौटुंबिक वादांपासून सुटका मिळविण्यासाठी या लोकांनी गरीब लोकांना केशरयुक्त दूधाचे वाटप करावे.
सूर्यग्रहणाच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी शनि मंदिरात जाऊन काळे तीळ आणि तेल अर्पण करावे. असे केल्याने येणाऱ्या समस्या आणि अडथळे दूर होण्यास मदत होते.
कुंभ राशीच्या लोकांनी सूर्यग्रहणाच्या दिवशी गरिबांना कपडे आणि चप्पल याचे दान करावे.
सूर्यग्रहणाच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी केळी, बेसनाचे लाडू आणि पेढे दान करावेत.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)