फोटो सौजन्य- pinterest
आज शुक्रवार, 28 नोव्हेंबरचा दिवस मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आज चंद्र दिवसरात्र कुंभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या होणाऱ्या हालचालीचा काही राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आज शुनाफ योग तयार होणार आहे. शुक्राच्या संक्रमणामुळे त्रिग्रही योग तयार होईल. शतभिषा नक्षत्राच्या युतीमुळे रवि योग देखील तयार होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांना आज अनेपक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. ज्याची तुम्ही अपेक्षा केली नसेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल. तुम्हाला भविष्यात फायदा मिळवून देणारे काहीतरी करण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला भागीदारीच्या कामातूनही फायदा होऊ शकतो.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. एखाद्या चिंता किंवा समस्येचे निराकरण झाल्यावर तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. तुम्ही कामात खूप व्यस्त राहू शकता. तुम्ही तुमची कार्यक्षमता आणि अनुभव वापरून परिस्थिती संतुलित करू शकाल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित फायदे होऊ शकतात. यावेळी तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. तुम्ही मुलांसोबत वेळ घालवू शकता.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या राजकीय संबंधांमुळेही तुम्हाला फायदा होईल. सरकारी क्षेत्राशी संबंधित कोणत्याही कामात तुम्हाला अनुभवी लोकांकडून सहकार्य मिळू शकेल. वैद्यकीय आणि औषध व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीची योजना आखू शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमचे कोणतेही बिघडलेले काम पूर्ण होऊ शकते.
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवन चांगले राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोतांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या नातेवाईक किंवा मित्राला भेटण्याची संधी देखील मिळू शकते त्यामुळे तुम्ही आनंदात राहाल. शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये तुमची आवड वाढेल. उद्या तुम्ही काहीतरी नवीन सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. व्यवसायात अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. जोडीदारासोबतचे तुमचे नाते आणि प्रेम अबाधित राहील. तुम्ही आज मुलांसोबत वेळ घालवू शकता. तुम्हाला परदेशी स्रोतांकडूनही फायदा होईल. तुमची शैक्षणिक कामगिरी उत्कृष्ट असेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






