गुजरात जायट्सचे DC समोर 175 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
DC vs GG, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज १७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायट्स यांच्यात खेळला जात आहे. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात नाणेफेक गामवणाऱ्या गुजरात जायट्सने बेथ मूनीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ९ गडी गमावत १७४ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १७५ धावा कराव्या लागणार आहेत.
वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात असेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन गुजरात जायट्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरातची सुरवात चांगली राहिली नाही. सोफिया डिव्हाईन १३ धावा करून बाद झाली. त्यानंतर बेथ मूनी आणि अनुष्का शर्मा या जोडीने गुजरात संघाचा डाव सांभाळला. या दोघींनी ५३ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, अनुष्का शर्मा २५ चेंडूत ३९ धावा काढून बाद झाली. तिने ८ चौकार लगावले. तिला श्री चरणीने बाद केले. त्यानंतर मात्र गुजरातच्या फलंदाजांना मैदानावर तग धरता आला नाही. सलामीवीर बेथ मुनीने चांगली झुंज देत ४६ चेंडूत ५८ धावा केल्या. त्यानंतर ती माघारी गेली. या खेळीत तिने ७ चौकार लागावले. तिला नंदिनी शर्माने बाद केले.
Innings Break! 5⃣8⃣(46) from Beth Mooney 👌
4⃣ wickets for Sree Charani 👏 Will #DC chase down a 🎯 of 175 runs? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/73Ec3xR5A6 #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvDC pic.twitter.com/1M3QDLSnj0 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 27, 2026
त्यानंतर संघाच्या विकेट्स जात राहिल्या. कर्णधार ॲशले गार्डनर २, जॉर्जिया वेअरहॅम ११, भारती फुलमाली ३, कनिका आहुजा ४, काशवी गौतम २, तनुजा कंवर २१ धावा करून बाद झाल्या तर रेणुका सिंग ठाकूर ३ धावांवर नाबाद राहिली. दिल्लीकडून श्री चरणीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर चिनेल हेन्रीने २ विकेट्स घेतल्या. मारिझान कॅप, मिन्नू मणी आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे
दिल्ली कॅपिटल्स : शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान कॅप, निकी प्रसाद, चिनेल हेन्री, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
गुजरात जायंट्स : बेथ मूनी (विकेटकीपर), अनुष्का शर्मा, ॲशले गार्डनर (कर्णधार), सोफी डिव्हाईन, भारती फुलमाली, कनिका आहुजा, काशवी गौतम, रेणुका सिंग ठाकूर,राजेश्वरी गायकवाड, जॉर्जिया वेअरहॅम, तनुजा कंवर






