फोटो सौजन्य- pinterest
घरामध्ये आनंद, शांती आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आपण घरामध्ये वास्तूचे काही उपाय करतो. पण कधीकधी असे काही घडते की, सर्वकाही व्यवस्थित करूनही घरामध्ये समस्या निर्माण होतात. विनाकारण रागावणे, भांडणे होणे किंवा अस्वस्थ वाटणे ही सर्व लक्षणे घरात कुठेतरी नकारात्मक ऊर्जा वाढवण्यास कारणीभूत ठरतात. यावेळी हळदीचा एक सोपा उपाय करता येऊ शकतो. हळद हा स्वयंपाकघरातील मसाला नसून तो नशीब आणि सकारात्मकतेचे प्रतीक असल्याचे मानले जाते. जर तुम्ही हळदीचा योग्य वापर केल्यास घरातील ऊर्जा बदलण्यास मदत होते. जाणून घ्या हळदीचे कोणते उपाय केल्याने वास्तूदोष दूर होतो.
हळद ही नेहमीशुभ मानली जाते. तिचा रंग पिवळा असून तो सूर्याच्या उर्जेचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
वास्तूचे काही उपाय केल्याने घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये आनंद शांतीचे वातावरण राहते. हळद ही केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नसून मानसिक संतुलन राखण्यासाठी आणि ऊर्जा शुद्ध करण्यासाठी देखील खूप प्रभावी मानली जाते.
घरामध्ये सतत भांडण होणे किंवा मन अस्वस्थ होत राहिल्यास लाल रंगांच्या कपड्यामध्ये हळदीची गाठ बांधून ती दरवाज्याच्या मुख्य दरवाजावर बांधा. असे केल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
दररोज देवाची पूजा करताना हळदीचा टिळा लावा आणि तोच टिळा तुमच्या कपाळावर लावा. यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि वास्तुदोष कमी होण्यास मदत होते.
दररोज सकाळी हळद पाण्यात मिसळून ती घरभर शिंपडा. यामुळे हवेतील नकारात्मकता दूर होईल आणि वातावरण हलके आणि शांत राहील.
पूजेदरम्यान लाल फुलांसोबत हळद अर्पण केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. हा उपाय शुक्रवार आणि सोमवारी केल्यास त्याचा खूप फायदा होतो.
घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच वास्तुदोषांचा प्रभाव कमी होतो. त्यासोबतच ताण आणि चिंता कमी होतात. कुटुंबामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी वाढते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक वातावरण जाणवते.
हळदीमध्ये नैसर्गिक शुद्धीकरण आणि संरक्षणात्मक शक्ती असतात. ज्यामुळे तिच्या रंगामध्ये असलेली ऊर्जा नकारात्मकता शोषून घेण्यास मदत करते. ज्यावेळी तुम्ही घरामध्ये हळदीचा वापर करता तेव्हा ती फक्त वस्तू राहत नाही तर तुमच्या घराचे रक्षण करणारी ऊर्जा बनते. जुन्या काळातही लोक घराचा पाया घालताना हळद मिसळलेले पाणी शिंपडत असत, जेणेकरून त्या घरावर कधीही वाईट परिणाम होणार नाही.
जर तुम्हाला घरामध्ये सतत त्रास, वाद किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास तर तुम्ही हळदीचा हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल. तो महाग किंवा कठीणही नाही. फक्त हळदीचा वापर भक्तीने करा आणि त्याचे परिणाम अनुभवा. घरातील वातावरण शांत, हलके आणि आनंदाने भरलेले वाटेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






