फोटो सौजन्य- pinterest
इंग्रजी कॅलेंडरनुसार नोव्हेंबर महिना हा 11 वा महिना आहे. यावेळी 1 नोव्हेंबर रोजी देवुठाणी एकादशीची सुरूवात होणार आहे. त्यानंतर शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त असतील. चातुर्मासमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मुंज यांसारखे शुभ कार्य केले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन गाडी खरेदी करण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्ताची गरज नाही आहे. नोव्हेंबरमध्ये गाडी किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी फक्त 7 मुहूर्त आहेत. तुमच्यासाठी कोणता मुहूर्त सर्वोत्तम आहे. जाणून घ्या नोव्हेंबर महिन्यातील मुहूर्ताची यादी.
जर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये गाडी खरेदी करायची असल्यास शुभ मुहूर्त आहे. तुम्ही नोव्हेंबरमध्ये 3,7,9, 10,17,26 आणि 28 या दिवशी नवीन गाडीची खरेदी करू शकता.
सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त दुपारी 3.5 वाजल्यापासून 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.5 पर्यंत आहे. यावेळी रेवती नक्षत्र असेल. तर कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथी असेल.
वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त सकाळी 11.5 वाजल्यापासून 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.28 वाजेपर्यंत. यावेळी रोहिणी, मृगाशिरा नक्षत्र असेल तरमार्गशीर्ष कृष्ण तृतीया तिथी राहील.
वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त संध्याकाळी 8.4 वाजल्यापासून 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.40 वाजेपर्यंत. यावेळी पुनर्वसू नक्षत्र असेल तर मार्गशीर्ष कृष्ण पंचमी, षष्ठी तिथी राहील.
वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त सकाळी 6.40 वाजल्यापासून 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 12.7 वाजेपर्यंत. यावेळी पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्र असेल तर मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी तिथी राहील.
वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त सकाळी 6.45 वाजल्यापासून 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.46 वाजेपर्यंत. यावेळी चित्रा आणि स्वाती नक्षत्र असेल तर मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी तिथी राहील.
वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त सकाळी 6.53 वाजल्यापासून 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 12.1 वाजेपर्यंत. यावेळी श्रावण नक्षत्र असेल तर मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी तिथी राहील.
वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त सकाळी 6.54 वाजल्यापासून 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 12.15 वाजेपर्यंत. यावेळी शतभिषा नक्षत्र असेल तर मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी तिथी राहील.
नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन घर, फ्लॅट, जमीन किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असल्यास तुम्हाला टोकन पैसे भरावे लागतील किंवा नोंदणी करावी लागेल, तर त्यासाठी फक्त सहा दिवस शुभ काळ आहे. 7, 13, 14, 20, 21 आणि 28 नोव्हेंबर रोजी मालमत्ता किंवा नवीन कार खरेदी करू शकता.
मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 12.33 ते 6.38 आहे. यावेळी नक्षत्र मृगाशिरा असेल. मार्गशीर्ष कृष्ण तृतीया तिथी राहील.
मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 6:42 ते सकाळी 6:43 राहील. यावेळी माघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र राहील. तर
मार्गशीर्ष कृष्ण नवमी, दशमी तिथी राहील.
मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 6:43 ते रात्री 9:20 वाजेपर्यंत मुहूर्त असेल. यावेळी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र राहील. तर मार्गशीर्ष कृष्ण दशमी तिथी राहील.
मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 6:48 ते 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:49 वाजेपर्यंत मुहूर्त असेल. यावेळी विशाखा आणि अनुराधा नक्षत्र राहील. तर मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा तिथी राहील.
मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 2:49 ते 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:55 वाजेपर्यंत मुहूर्त असेल. यावेळी पूर्वाभाद्रपद नक्षत्र राहील. तर मार्गशीर्ष शुक्ल नवमी तिथी राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






