फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. यावेळी भक्तांना शिवाशी संबंधित अनेक गोष्टी दिसतात. श्रावण महिन्यात स्वप्नामध्ये नागांची जोडी दिसण्याचा नेमका अर्थ काय सांगितला आहे, जाणून घ्या
मान्यतेनुसार, भगवान शिवांना हा महिना खूप प्रिय असल्याने यावेळी भक्त त्यांची मनोभावे पूजा करतात. यावेळी शिव एखाद्यावर प्रसन्न झाले असल्यास काही ना काही संकेत मिळाले जातात. असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात नागांची जोडी दिसणे किंवा ते घराच्या आसपास दिसणे. स्वप्नामध्ये नागांची जोडी दिसण्याचा अर्थ काय आहे.
असे मानले जाते की, श्रावन महिन्यात नाग-नागिनची जोडी पाहणे हे आनंदाचे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या महिन्यात नाग-नागिनची जोडी पाहणे म्हणजे घरात एक शुभ घटना घडणार आहे असे मानले जाते. या घटनेला संपत्ती, समृद्धी आणि आनंदाचे लक्षण देखील मानले जाते.
मान्यतेनुसार, स्वप्नात नागांची जोडी दिसणे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रामध्ये याला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात ही जोडी दिसण्याचा असाही अर्थ होतो की, तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे. तसेच तुमच्या जीवनात आनंद येणार आहे असा देखील अर्थ होतो. त्यासोबतच वैवाहिक जीवन आणि संपत्तीसाठी स्वप्नामध्ये ही जोडी दिसल्यास शुभ मानले जाते.
श्रावण महिन्यामध्ये घरात किंवा जमिनीवर ही जोडी दिसणे शुभ मानले जाते. घरामध्ये ही जोडी दिसल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रगती होणे आणि जीवनामध्ये असलेल्या दुःखापासून मुक्तता होणे हे संकेत असू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जमीन खरेदी करायला गेलात आणि तुम्हाला नागांची जोडी दिसल्यास ते देखील शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे असा होतो.
श्रावण महिन्यात स्वप्नात पांढरा साप दिसणे शुभ असते. भगवान शिव प्रसन्न झाल्यावर स्वप्नात पांढरे साप दिसतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात पांढऱ्या सापांची जोडी किंवा नागांची जोडी दिसल्यास व्यक्तीचे भाग्य उजळते, असे म्हटले जाते. हे स्वप्न दिसणे म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या जीवनात सकारात्मक बदल, आर्थिक लाभ होण्याचे येण्याचे संकेत देते. मान्यतेनुसार स्वप्नामध्ये ही जोडी दिसल्यास त्या व्यक्तीचे नशीब बदलते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)