फोटो सौैजन्य: गुगल
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचे विचारआणि शिकवण ही मानसिक नैराश्याने ग्रासलेल्या मानवी जीवनाला आजही मोलाचं मार्गदर्शन करते. स्वामींनी कधीही कर्मकांडांला दुजोरा दिला नाही तर माणसाला सेवाभावाती शिकवण दिली. असं म्हणतात की स्वामी समर्थ हे साक्षात दत्त गुरुंचे अवतार आहेत. त्यामुळे नवनाथ संप्रदायात स्वामींना मोठ्य़ा आदराचं स्थान दिलं जातं. गुरुचरीत्रामनुसार स्वामी हे गुरु दत्तात्रयांचे तिसरे अवतार आहेत. स्वामी प्रकट झाल्यानंतर त्यांनी पंजाब आणि नंतर देशभर भ्रमंती केली. मात्र निवासस्थान त्यांनी अक्कलकोट क्षेत्र निवडवलं. याच अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांना स्वामी हे नावं कोणी दिलं याबाबत जाणून घेऊयात.
स्वामींना स्वामी हे नाव कसं मिळालं किंवा अक्कलकोट तीर्थक्षेत्राचं महत्त्व काय याबाबत डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे श्री क्षेत्र शिवपुरी येथील श्री बाळप्पा मंदिराचे अध्यक्ष आहेत. डॉ. पुरुषोत्तम यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर माहिती सांगितली आहे. डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले असं सांगतात की, अक्कलकोट हे अत्यंत प्रचीन ठिकाण आहे. त्याचं मुळ नाव हे विद्यानगर असं होतं. असं म्हटलं जातं की, पंढरपूर, तुळजापूर आणि गाणगापूर हे तीन शक्तीपीठांचं केंद्र आहे. पारसी भाषेत अक्कल म्हणजे विद्या आणि कोट म्हणजे केंद्र विद्येचे केंद्र म्हणजे अक्कलकोट. अक्कलकोटला धार्मिक आणि विद्येचा मोठा वारसा आहे. या तीनही शक्तीपीठ जवळ आहेत त्याचबरोबर असं म्हटलं जातं की श्रीपाद वल्लभ दत्तात्रयांचा या भूमीत वास आहे. त्यामुळे अक्कलकोट हे मोठं शक्तीपीठ देखील आहे.
देशभर भ्रमंती केल्यानंतर स्वामींनी अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात निवास केला. त्यांनी भक्तांना माणूसपणाची शिकवण दिली. स्वामी प्रकटल्यानंतर त्यांनी भक्तांनी स्वत:च्या नावाची अशी ओळख सांगितली नाही. डॉ. पुरुषोत्तम यांनी सांगितल्याप्रमाणे स्वामींना स्वामी हे नावं खुद्द त्यांच्या भक्तांनीच दिलं आहे. स्वामींच्या शिकवणीनुसार गुरु हा कोणत्याही रुपात असू शकतो. या गुरुला तुम्ही आई, वडिल किंवा मित्र देखील म्हणू शकता. म्हणूनच स्वामींना स्वामीआई देखील म्हटलं जातं. स्वामी या शब्दाचा अर्थ असा की, स्व म्हणजे स्वतःचा त्याग आणि मी म्हणजे अहंभाव. दोन शब्दांपासून बनलेला एक शब्द म्हणजे स्वामी. “स्वतःच्या अहंभावाचा त्याग केलेला योगी म्हणजे स्वामी होय. “समर्थ” म्हणजे “सामर्थ्यवान” किंवा “सर्वशक्तिमान”. या दोन्ही शब्दांचा एकत्रित अर्थ “स्वतःच्या अहंभावाचा त्याग करून सर्वशक्तिमान बनलेला” असा होतो. म्हणूनच, “श्री स्वामी समर्थ” हे नाव केवळ एक नाव नसून, ते एक आध्यात्मिक मंत्र मानलं जातं, ज्याचा जप भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केला जातो.
“स्वामी समर्थ” हे नाव श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात आणि भक्तांच्या अनुभवांमधून प्राप्त झालं. त्यांच्या मूळ नावाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु काही संदर्भांनुसार त्यांचं पूर्वीचं नाव “नृसिंह भान” असं होतं. स्वामी समर्थ हे दत्तसंप्रदायातील तिसरे पूर्णावतार मानले जातात, ज्यांनी अक्कलकोट येथे २२ वर्षे वास्तव्य केलं आणि भक्तांना मार्गदर्शन केलं.
“श्री स्वामी समर्थ” हे नाव केवळ एक नाव नसून, ते एक आध्यात्मिक मंत्र मानलं जातं, ज्याचा जप भक्तांना मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देते. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील विविध घटनांमध्ये, त्यांनी स्वतःला “स्वामी समर्थ” म्हणून ओळख दिली नाही. त्यांच्या भक्तांनी त्यांच्या दैवी गुणांचा अनुभव घेतल्यामुळे त्यांना “स्वामी समर्थ” हे नाव दिलं, ज्याचा अर्थ त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा आणि मार्गदर्शनाचा प्रतीक आहे.त्यामुळे, “स्वामी समर्थ” हे नाव भक्तांच्या श्रद्धेचा आणि महाराजांच्या दैवी कार्याचा परिणाम आहे, ज्याने आजही लाखो भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली आहे.