फोटो सौजन्य- pinterest
मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिर जेवढे प्रसिद्ध आहे तेवढेच मुंबईपासून जवळपास असलेल्या कल्याण आणि डोंबिवलीच्यामध्ये असलेले टिटवाळा येथील महागणपती प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा आणि भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवणारा गणपती आहे. संकष्ट चतुर्थी, मंगळवार आणि माघी गणेशोत्सवाच्या काळात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने टिटवाळ्याच्या महागणपतीबद्दल जाणून घेऊया
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथील गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. टिटवाळा गावात असलेले गणपतीचे देऊळ हे इच्छापूर्ती श्री महागणपती मंदिर म्हणून ओळखले जाते. अशी श्रद्धा आहे की या गणपतींच्या अशीर्वादाने भक्तांची इच्छा पूर्ण होते. पूर्वी येथे कण्वऋषींचा आश्रम होता. याच महागणपतीची पूजा शकुंतलेने केली होती. म्हणून या महागणपतीस ‘विवाहविनायक’ असेही म्हणतात.
पुराणकाळात शकुंतलेची विस्मृती राजा दुष्यंतला झाली. तसेच यानंतर या गणपतीची स्थापना कण्व मुनींनी केली आणि शकुंतलेस उपासना करण्यास सांगितले. शकुंतलेले मुनींनी सांगितल्याप्रमाणे उपासना केली आणि ऋषी दुर्वासांच्या शापातून मुक्त झाली. त्यानंतर राजा दुश्यंतला शंकुतला आठवली आणि नंतर शकुंतला- दुष्यंत यांचे परत मिलन झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. शकुंतलेला शाप ऋषी दुर्वासांचे यथायोग्य स्वागत केले नसल्याने मिळाला होता. म्हणून या शापामुळे राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. या गणपतीची आराधना शकुंतलेने केल्याने दुष्यंताला सारे काही आठवले आणि शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती आहे.
कल्याण-कसारा मार्गावर नदीच्या काठावर असलेले हे देऊळ खूप प्राचीन असून शकुंतलेले त्याची मूळ बांधणी केली, असल्याची आख्यायिका आहे. एका सरोवरात हे देऊळ बांधले आहे. काळाच्या ओघात यामध्ये गाळ साचून हे देऊळ गाडले गेले आणि सरोवर नाममात्र राहिले. तसेच माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळावेळी पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन केले. यादरम्यान जसेच्या तसे देऊळ सापडले. अभंग स्वरूपात देवाची मूर्तीही मिळाली. माधवराव पेशव्यांनी वसईची लढाई जिंकल्यावर या देवळाचे पुनरुत्थान केले. तसेच लाकडी सभामंडप देवळासमोर बांधला. या सभामंडपाचे नुतनीकरण १९९५-९६मध्ये केले. आजही तसेच आहे.
टिटवाळा येथील गणपतीचे मंदिर साधे आहेत. तसेच शेंदुराने माखलेला गणपती बाप्पाच्या मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेतो. तसेच मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. गणपतींच्या मुर्तीला नेहमी पितांबर नेसवला जातो. तसेच मंदिरात चांदीची छत्री आहे. मंदिराच्या परिसरात एक छोटी दीपमाळ आहे आणि मंदिराच्या मागे एक सरोवर देखील आहे. मंदिरात साडेतीन फूट उंचीची शेंदुराने माखलेली गणपतीची मूर्ती आहे. नाभी व मूर्तीचे डोळे सफ्टीक मण्यांची आहे. या मूर्तीच्या चरणांशी यक्ष-गंधर्व आहे तर डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहे. तसेच गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. अशी मान्यता आहे की या गणपती बापांच्या अशीर्वादाने मुला-मुलींचे विवाह लवकर जुळतात आणि सभा मंडपात चांदीचा उंदीर आहे. भक्तगण या उंदीरच्या कानात आपली इच्छा सांगतात.
मंदिर प्रशस्त जागेत वसलेले असल्याने मंदिरात गेल्यावर गणपतीचे अगदी सहज दर्शन होते. सभामंडप, बाजूला तलाव, बगीचा आहे. त्यामुळे आलेल्या भाविकांना अगदी मनोभावे दर्शन करता येते. आजूबाजूच्या प्रसन्न वातावरणातही आनंद घेता येतो. त्याचबरोबर मंदिर प्रशासनान भक्तांनी अर्पण केलेल्या दानधर्मातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: महागणपती यांची कृपा मिळाल्यास विवाहातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांना “विवाहविनायक” म्हटले जाते.
Ans: पौराणिक कथेनुसार, शकुंतला यांनी राजा दुष्यंत यांच्याशी पुनर्मिलन व्हावे म्हणून येथे गणपतीची उपासना केली होती. त्यांच्या भक्तीमुळे त्यांचे मिलन झाले, असे मानले जाते.
Ans: विवाह (लग्न) संबंधित अडचणी दूर करणारा आणि योग्य जोडीदार मिळवून देणारा विनायक म्हणजे विवाहविनायक






