अहिल्यानगरच्या टाकळी खादगाव येथील पादीर कुटुंबाने हक्काच्या शेतरस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. “शेतरस्त्याचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. अखेर प्रशासनाने लवकरच कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.